धूम स्टाईल लुटीचा थरार, तळपत्या उन्हात त्याच्यामागे 6 पल्सर वेगाने आल्या, तो थांबला नाही, अखेर त्याच्या डोळ्यात त्यांनी…

जळगाव जिल्हा हा सर्वसामान्यांसाठी कितपत सुरक्षित आहे? असा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. धरणगाव सारख्या शहरापासून अवघ्या काही अंतरावर 6 दरोडेखोरांनी जे कृत्य केलंय ते अतिशय धक्कादायक आणि हादरवणारं आहे.

धूम स्टाईल लुटीचा थरार, तळपत्या उन्हात त्याच्यामागे 6 पल्सर वेगाने आल्या, तो थांबला नाही, अखेर त्याच्या डोळ्यात त्यांनी...
फाईल फोटो
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 9:04 PM

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा हा कितपत सुरक्षित आहे? हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. नुकतंच बुलेरोच्या बोनेटवर बसून एका इसमाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या इसमाने माफी देखील मागितली. पण अशी घटना नेमकी घडूच कशी शकते? हाच मोठा प्रश्न आहे. पोलिसांनी बोनेटवर बसून दहशत माजवणाऱ्याला अद्दल घडवली. संबंधित इसमाने जाहीरपणे माफीही मागितली. पण त्यापलिकडेही आणखी धक्कादायक घटना आज जळगाव जिल्ह्यातील धरणगावात घडली. बॉलिवूडच्या चित्रपटालाही लाजवेल अशी सिनेस्टाईल लुटीची घटना आज धरणगावात भर दुपारी घडली. त्यामुळे पोलीस नेमकं काय करतात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

आपण ‘धूम’ हा हिंदी चित्रपट पाहिलाय. या चित्रपटात चोरटे कशा पद्धतीने चोरी करतात अगदी तशाच घटनाक्रमासारखी घटना आज धरणगावात घडली. 6 दरोडेखोरांनी भर दिवसा एका ठेकेदाराला लुटलं आहे. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला निर्घृणपणे मारहाण देखील केली. या मारहाणीत हा ठेकेदार गंभीर जखमी झालाय. संबंधित प्रकारामुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांना शहरातील पोलिसांची काहीच भीती उरलेली नाही हेच यातून स्पष्ट होताना दिसत आहे. भर दिवसा हे दरोडेखोर इतकं भयानक कृत्यू कसं करु शकतात? हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

नेमकं काय घडलं?

सहा दरोडेखोरांनी एका सेंट्रिंग ठेकेदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तसेच पाठीवर चाकूने वार करत अडीच लाख रुपये लुटून नेले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरापासून काही अंतरावर दिवसाढवळ्या ही लुटीची घटना घडली. राजेंद्र सूर्यवंशी असं लूट झालेल्या सेंट्रींग ठेकेदाराचं नाव आहे.

दरोडेखोरांनी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या पाठीवर चाकुने 3 वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. राजेंद्र सूर्यवंशी हे जळगावातून अमळनेरला आपल्या घरी दुचाकीने निघाले होते. त्यांच्यासोबत प्लॉटिंग व्यवहाराचे अडीच लाख रुपये होते. सहा दरोडेखोरांनी पल्सर गाड्यांवर त्यांचा पाठलाग केला.

दरोडेखोरांनी म्हसले गावाजवळ त्यांची दुचाकी अडवली. दरोडेखोरांनी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या पाठीवर चाकूने वार करत सूर्यवंशी यांच्याकडे असलेले अडीच लाख रुपये आणि त्यांची दुचाकी लुटून नेली. दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमळनेर, धरणगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा तपास करत आहे.

Non Stop LIVE Update
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं..
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं...