जळगावच्या सराफा बाजारात सोन्याची उसळी, भाव ऐकून ग्राहक हैराण

| Updated on: Apr 06, 2024 | 5:17 PM

जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने पुन्हा मुसंडी मारली. दोन दिवसांपूर्वी 4 एप्रिल रोजी सोन्याने जीएसटीसह 70 हजारांचा टप्पा गाठला होता. आता सोने आणि चांदीने त्यापुढचा टप्पा गाठला आहे. याच महिन्यात सहा दिवसांत केलेली ही घौडदौड ग्राहकांच्या पचनी पडलेली नाही, हे नक्की

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याची उसळी, भाव ऐकून ग्राहक हैराण
जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदी भिडले गगनाला
Follow us on

Jalgaon Gold Silver Price : जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने आज पुन्हा कहर केला. दोन दिवसांपूर्वी मौल्यवान धातूंनी मुसंडी मारली होती. त्यानंतर आज या धातूंनी नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला आहे. जागतिक घाडमोडी आणि चीनच्या खेळीमुळे सोने आणि चांदीला बहर आला आहे. 4 एप्रिल रोजी सोन्याने जीएसटीसह 70 हजारांचा टप्पा गाठला होता. तर चांदीचे दर 80 हजार 340 रुपयापर्यंत पोहोचले होते. आता दोन्ही धातूंनी हा रेकॉर्ड पण इतिहासजमा केला आहे.

इतका वधारला भाव

  • गेल्या काही दिवसांपासून देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज सराफ बाजारात सोन्याचे दर बाराशे रुपयांनी वाढले असून जीएसटी सह सोन्याचे दर हे 73 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर सुद्धा वधारले असून चांदी 83 हजारवर पोहोचले आहे.
  • सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केला होता . काल 71 हजार 800 रुपयांवर असलेले सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी वाढ झाली सोन्याचे जीएस टी सह दर हे 73 हजारांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरात सुद्धा तब्बल 2 हजार रुपयांनी वाढ झाली असून 81 हजार रुपयांवर असलेल्या चांदीचे दर 83 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच अनेक देशांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच प्रमाण वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढत असल्याचे सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आहे लग्नसराई मध्ये सोन्याचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट मात्र चांगलेच कोलमडले असून सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

हे सुद्धा वाचा

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोने 69,882 रुपये, 23 कॅरेट 69,602 रुपये, 22 कॅरेट सोने 64,012 रुपये झाले.18 कॅरेट 52,412 रुपये, 14 कॅरेट सोने 40,881 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,096 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.