
किशोर पाटील/ प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड म्हणवले जाणारे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे झोकात वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. माध्यमांना काय दिलं की ते विकतं याची अचूक नाडी त्यांनी हेरली आहे. आज राष्ट्रीय मतदार दिन आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी मतदानाचा हक्क काय असतो यावर विवेचन केले. पण वादाचं अचूक टायमिंग साधलं. तीन वर्षांपूर्वी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत टिप्पणी करताना बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Gulbrao Patil on Hema Malini) यांना वादात ओढले होते. आता ही पाटलांचा पुन्हा तोल सुटला आहे.
तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा
जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार राजा, मतदानाचा हक्क याविषयी ऊहापोह केला. राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही आता डॉक्टर बाबासाहेबांनी टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार दिला आहे.तोच अधिकार आपल्या सर्वांना दिला आहे. हेमा मालिनीला सुद्धा एक मत देण्याचा अधिकार दिला आहे.मंचावर उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुखांना उद्देशून मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असा समजा असं वादग्रस्त वक्तव्य पाटलांनी यावेळी केलं. राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. राजा आता मतपेटीतून जन्माला येतो हा इतिहास डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवल्याचे ते म्हणाले.
एकनाथ खडसेंवर टीका
कोण म्हणते देवाकडे वर भरावा लागतो आता खालीच भरावं लागतं. मुक्ताईनगर मध्ये निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची लढाई झाली. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे भाजपचं काम त्या ठिकाणी केलं हा कोणता पिक्चर आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंचं नाव न घेता टीका केली.खडसे माझ्यावर टीका करायचे गुलाबराव पाटील असा आहे आणि तसा आहे अरे बाबा मी निवडून आलो रे भो, मी असा तसा नाही आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तुम्ही आम्हाला त्रास दिला.खडसे यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं. आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला. जिल्ह्यात तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला हे आता भोगाव लागते आहे. माजी मंत्री सोबत बॅग पकडायला कोणी राहत नाही , असा खरपूस समाचार गुलाबराव पाटलांनी खडसेंचा घेतला.
इम्तियाज जलील यांना सल्ला
इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र हिरवागार करू असं वक्तव्य केलं. त्याला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कोणी म्हटल्याने महाराष्ट्र हिरवा गार आणि पिवळा गार होत नसतो.अशा वक्तव्याला अर्थ नाही इम्तियाज जलील यांना माझा सल्ला आहे अशा प्रकारे वक्तव्य त्यांनी करू नये? आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे गुलाबराव पाटील यांनी सल्ला दिला.तर संजय राऊत यांना काय माहिती की कोण? सासरा आणि कोण? सून आहे ते. त्यांच्या बोलण्यापुरत्या ह्या गोष्टीं मर्यादित आहे. संजय राऊत यांना हे माहिती नाही की महाराष्ट्रात आम्ही या निवडणुकीत दोन नंबरचा परफॉर्मन्स आम्ही केला आहे, असा टोला त्यांनी लगावला.