Jalgaon DCC Bank Election 2026: “आमदार मंगेश चव्हाण हा तर…”, शिंदे गटाच्या आमदार पुत्राची जीभ घसरली, जळगावमध्ये भाजप-शिवसेनेत जुंपली

शिवसेना शिंदे गटाच्या सुमित पाटलांचा अर्ज आमच्यामुळे बा, आणि माझ्यामुळे वैध झाला, आम्ही अर्ज बाद करावे म्हणून आक्षेप घेतला होता, त्यानंतर तो मागे घेतला अशी जाहीर कबुली आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. ज्यानंतर सुमीत पाटील हे तडकाफडकी या मेळाव्यातून निघून गेले

Jalgaon DCC Bank Election 2026:  “आमदार मंगेश चव्हाण हा तर..., शिंदे गटाच्या आमदार पुत्राची जीभ घसरली, जळगावमध्ये भाजप-शिवसेनेत जुंपली
| Updated on: Nov 19, 2026 | 6:03 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी:  जळगाव जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त आयोजित महायुतीच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे.  शिवसेना शिंदे गटाच्या सुमित पाटलांचा अर्ज आमच्यामुळे बा, आणि माझ्यामुळे वैध झाला, आम्ही अर्ज बाद करावे म्हणून आक्षेप घेतला होता, त्यानंतर तो मागे घेतला अशी जाहीर कबुली आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. ज्यानंतर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील हे तडकाफडकी या मेळाव्यातून निघून गेले. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

काय म्हणाले आमदार मंगेश चव्हाण?

Loading...

“जे आडवे येतील त्यांच्या छातावर पाय ठेवून पुढे जाण्याची माझी ताकद आहे. मी लेचापेचा कार्यकर्ता नाही. ह्यांची काय लायकी आहे हे 30 तारखेला दिसेल. किशोर आप्पांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं, उमेदवारी अर्ज मीच भरला, अधिकाऱ्यांना मीच सांगितलं हा फॉर्म अवैध करा. ज्यावेळी फॉर्म वैध करायचा होता तेव्हाही मीच सांगितले, फॉर्म वैध करा. पण पाठीशी खंजीर कुणी खुपसला तर मंगेश चव्हाण कसा हिशोब करतो हे पाहायला तुम्ही साक्षीला राहा,” असं आमदार मंगेश चव्हाण यावेळी म्हणाले.

“ते मला गांडू म्हटले, नामर्द म्हटले. सुमीत लहान आहे त्याला उत्तर देणे मला योग्य वाटतं नाही, त्याच्या बापाला मी उत्तर देईन. मुलाला आवर घातला पाहिजे. त्यांचे वय किती आपण बोलतो किती? माझे भाषण तुम्ही पुन्हा ऐका. मी महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकत असेल त्यांचे पाय छाटू असं मी बोललो. सत्तेची, पैशाची मस्ती जास्त काळ टिकत नाही,” असं आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सुमीत पाटील यांचा मंगेश चव्हाण यांच्यावर पलटवार! 

“मंगेश चव्हाण यांनी माझा फॉर्म उडवला आणि त्यांनीच पुन्हा तो वैध केला, याची त्यांनी कबुली दिली आहे. मंगेश चव्हाण नामर्द माणूस आहे. निवडणूक अधिकाऱ्याला मोठी रक्कम देऊन माझा फॉर्म बाद करण्यात आला. माझ्यामागे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शक्ती उभी होती. भाजपचे आणि आमचे चांगले संबंध आहेत मात्र एका माणसामुळे वाद निर्माण होत आहे, अशा व्यक्तीला दूर ठेवावे अशी विनंती मी गिरीश महाजन यांच्याकडे करणार आहे,’ असं म्हणत सुमीत पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर अत्यंत टोकाची टिका केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us