डोक्यावर बर्फ-तोंडात साखरेसाठी ख्याती, राष्ट्रवादीचा दिग्गज नेता भडकला, तेही शिंदेंच्या बांधकाम खात्यावर

| Updated on: Dec 06, 2021 | 3:57 PM

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेलेल्या बळींप्रकरणी बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांवर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल का करु नये, असा सवाल अरुण गुजराथी यांनी विचारला. ते जळगावात बोलत होते.

डोक्यावर बर्फ-तोंडात साखरेसाठी ख्याती, राष्ट्रवादीचा दिग्गज नेता भडकला, तेही शिंदेंच्या बांधकाम खात्यावर
राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथींचा खड्ड्यांवरुन संताप
Follow us on

जळगाव : डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, असं ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी (Arun Bhai Gujarathi). रस्त्यातील खड्ड्यांवरुन गुजराथी संतापले आणि त्यांनी आपल्याच सरकारमधील सहकारी पक्ष शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर राग व्यक्त केला.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेलेल्या बळींप्रकरणी बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांवर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल का करु नये, असा सवाल अरुण गुजराथी यांनी विचारला. ते जळगावात बोलत होते.

काय आहे प्रकरण?

अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील चोपडा शिरपूर रस्त्यावरील कलंगीपर्यंतचा रस्ता आणि शहरापासून निमगावपर्यंत रस्त्याची अत्यंत वाईट दशा झाली आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे झालेल्या गंभीर अपघातात गेल्या तीन महिन्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अरुण गुजराथींसह नागरिकांचा ठिय्या

अनेक वेळा तक्रार करुनही बांधकाम विभागाचे अधिकारी खड्डे बुजवत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.अरुणभाई गुजराथी यांच्यासह नागरिकांनी रस्त्यात ठिय्या मांडला आणि संबंधित मक्तेदारांना ताबडतोब खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केली.

बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना फोन

यावेळी अरुणभाई गुजराथी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा गिरासे यांना फोन करुन खंत व्यक्त केली. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून आपण राजकारणात आहोत, परंतु इतकं निद्रिस्त बांधकाम विभाग आपण कधीच पाहिलं नाही. 26 लोकांचे बळी गेल्यानंतरही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम होत नसेल तर 302 चा गुन्हा का दाखल करू नये? असा प्रश्नही त्यांनी विचारला

ही अत्यंत गंभीर बाब आहे. तुम्ही तातडीने तुमच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवा अन्यथा आपण याच ठिकाणी बसून राहणार आहोत, असा इशाराच यांनी दिला.

संबंधित बातम्या :

आता सरकार तुमचं आहे तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत? विखे-पाटलांचा‌ प्राजक्त तनपुरेंवर घणाघात

सातारा जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक, शिवेंद्रराजेंना मागे टाकत नितीन जाधव-पाटील यांची वर्णी कशी?

शिवसेनेच्या UPA मध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या, सूत्रांची माहिती; संजय राऊत काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेणार