Jalgaon News: ‘एसआयआर’वरुन महायुतीत जुंपली! शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप; राजकारण तापलं

जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एसआयआर प्रक्रियेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून असंख्य मतदारांच्या नावांवर हरकती घेण्याचा कट रचल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे अनिल चौधरी यांनी केला आहे.

Jalgaon News: एसआयआरवरुन महायुतीत जुंपली! शिंदे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप; राजकारण तापलं
| Updated on: Nov 12, 2026 | 9:40 PM

रवी गोरे, प्रतिनीधी टीव्ही 9 मराठी

Jalgaon Politics Shivsena Vs BJP:  एसआयआर प्रक्रियेवरुन महायुतीमध्येच जोरदार जुंपल्याचे दिसत आहे. जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल चौधरी यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून असंख्य मतदारांच्या नावावर हरकती घेण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे महायुतीमधील तीनही पक्ष हे एसआयआरसाठी स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.  मात्र याबाबत भाजपवर आक्षेप नोंदवा असे एकनाथ शिंदे यांच्याकडून निर्देश आहेत का ? याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवावे लागेल, असं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलं आहे. यामुळे जळगावचं राजकारण चांगलंच तापल्याचे दिसत आहे.

Loading...

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एसआयआर प्रक्रियेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून असंख्य मतदारांच्या नावांवर हरकती घेण्याचा कट रचल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे अनिल चौधरी यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर संजय सावकारे यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेणे हा त्यांच्या राजकीय डिमोशनचा भाग असून, आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रिपदही जाणार असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.

दरम्यान, अनिल चौधरी यांच्या आरोपांना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे इतके वाईट दिवस आलेले नाहीत की, एका तडीपार व्यक्तीचा सल्ला घेऊन मंत्रिपद काढले जाईल, अशा शब्दांत सावकारे यांनी चौधरींवर निशाणा साधला. तसेच दोन दिवस शिवसेनेत न आलेल्या अनिल चौधरींची संपूर्ण शिवसेना आणि भाजपही त्यांच्या घरची असल्यासारखी वक्तव्ये सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दुसरीकडे, अनिल चौधरी यांच्यासमवेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे उपस्थित होते त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयआर बाबत भाजपावर आक्षेप घेण्याचे यांना निर्देश दिले का? असा प्रश्न उपस्थित करत याबाबत वरिष्ठ पातळीवर ही माहिती कळवणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे भुसावळमध्ये महायुतीतील दोन मित्रपक्षांमधील वाद आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us