AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha Election 2024 | महाविकास आघाडीचं ठरलं? चर्चा सुरु होत नाही तोच, काँग्रेसकडून असंतोषाची पहिली ठिणगी

Loksabha Election 2024 | 'तर होऊ द्या मग बिघाडी', लोकसभेच्या 'या' जागेवरुन काँग्रेस नेत्याचा मविआला इशारा. लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला किती जागा मिळणार? कोण कुठल्या मतदारसंघातून लढणार? यावर एकमत झाल्यात जमा आहे.

Loksabha Election 2024 | महाविकास आघाडीचं ठरलं? चर्चा सुरु होत नाही तोच, काँग्रेसकडून असंतोषाची पहिली ठिणगी
| Updated on: Nov 15, 2023 | 1:30 PM
Share

जळगाव (रवी गोरे) : देशातील प्रमुख राजकीय पक्ष पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA विरुद्ध काँग्रेस प्रणीत INDIA आघाडीमध्ये मुख्य लढत आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही आघाड्या आपपाली मोर्चेबांधणी करत आहेत. लोकसभा निवडणुकीला आता काही महिने उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कुठल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची याचा विचार करत आहे. आपल्या राजकीय ताकदीनुसार राजकीय पक्ष त्या-त्या मतदारसंघावर दावा सांगत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट हे इंडिया आघाडीमध्ये आहेत. या तिन्ही पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठीची जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा या ठाकरे गटाला मिळू शकतात. ठाकरे गटाला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 13 ते 15 जागा आणि शरद पवार गटाला 10 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय. मविआमध्ये जागा वाटपावरुन सर्वच चित्र समाधानकारक, आलबेल असं नाहीय. जळगावातील रावेर लोकसभेच्या जागेवरुन असंतोषाची पहिली ठिणगी पडली आहे. “शेवटपर्यंत रावेर लोकसभेची जागा ही काँग्रेसचं लढणार, अन्यथा आघाडीमध्ये बिघाडी होणार” असं रावेर लोकसभेचे काँग्रेसचे माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांनी म्हटलय.

रावेरची जागा मविआमध्ये कोण लढवणारय?

“आघाडीत आमचं जर कोणी ऐकत नसेल, तर काँग्रेसला गंभीर विचार करावा लागेल” काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांचा आघाडीच्या नेत्यांना एक प्रकारे हा इशारा आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे. “भाजपाला जर सत्तेपासून दूर ठेवायचं नसेल, तर होऊ द्या मग बिघाडी” असं त्यांनी म्हटलय. रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाणार असल्याची चर्चा आहे. रावेर लोकसभेवर आपलाच दावा कायम असल्याच काँग्रेसने म्हटलय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडीला बरच मंथन कराव लागणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 44 मतदारसंघाच्या जागवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत