AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध व्यक्त केली नाराजी

शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य निर्धार मेळाव्याला भाजपचा एकही मंत्री किंवा आमदार, खासदार उपस्थित नव्हते. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या मेळाव्यास उपस्थित नव्हते. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध व्यक्त केली नाराजी
मंत्री गुलाबराव पाटील
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 08, 2024 | 3:29 PM
Share

खेमचंद कुमावत, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : मंत्री गुलाबराव पाटीव यांनी जळगावात भर सभेत भाजप विरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य निर्धार मेळाव्याला भाजपचा एकही मंत्री किंवा आमदार, खासदार उपस्थित नव्हते. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या मेळाव्यास उपस्थित नव्हते. या कार्यक्रमाचे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, त्यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदारांना निमंत्रण देण्यात आलेले होते. मात्र या सर्वांनी या निर्धार मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने भर सभेमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्ती केली.

“मी निश्चितपणाने भाषणात देखील या संदर्भात बोललो आहे. वरिष्ठांकडे आजच्या मेळाव्यात जे घडलं या गोष्टी मी मांडणार आहे. युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नयेत. याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रावर होईल. उद्याच्या दिवशी मुंबईला कॅबिनेट मिटींग आहे. त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा प्रकार आम्ही मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.

“लोकसभा निवडणुकीत आपण एकसंघ होतो म्हणून विपरीत वातावरण असताना सुद्धा दोघं सीट आपल्या निवडून आल्या. त्याचप्रमाणे जर आपण विधानसभेत एकसंघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 11 जागा निवडून येऊ शकतात. मात्र आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे”, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी मांडली.

गुलाबराव पाटील यांनी भाषणात काय खंत व्यक्त केली?

“लोकसभेच्या वेळेस भाजपच्या नेत्या स्मिता वाघ उमेदवार नव्हत्या. आम्ही स्वतः उमेदवार होतो. आम्ही हेच सांगायचं, स्मिताताई खासदार होणार नाही नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहेत आणि त्यांच्या करता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला. माझ्या मतदारसंघांमध्ये 63 हजाराचा लीड दिला. किशोर आप्पा पाटलांच्या मतदारसंघात लीड दिला. आज भाजपच्या मंडळीला बोलावलेलं असताना देखील आमची भाजपची मंडळी आज आली नाही. याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“त्यावेळेस आम्ही नवरदेववाले होतो. भाजपवाले नवरी वाले होते. आता आम्ही नवरीवाले आहोत. भाजपवाले नवरदेव आले आहेत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. कारण नवरदेव वाल्यांना किंमत असते तेव्हा लोकसभेला गुलाबराव पाटलांनी भाजपचा प्रचार केला. आज विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटलाचं म्हणणं आहे की, आम्ही नवरीवाले आहोत. त्यामुळे आता भाजप नवरदेववाले असल्यामुळे त्यांना किंमत आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असंही गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?