AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात एसटी कर्मचारी आणि कामगार संघटना आमनेसामने, संघटनेकडून बस सुरु करण्याचा इशारा

एसटी कर्मचार्‍यांनी कामावर रुजू व्हावे असे अन्यथा नागरिकांच्या सोयीसाठी संघटनेमार्फत बस सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी भूमिका भारतीय एसटी कामगार संघटनेने घेतली आहे.

जळगावात एसटी कर्मचारी आणि कामगार संघटना आमनेसामने, संघटनेकडून बस सुरु करण्याचा इशारा
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 9:52 PM
Share

जळगाव : जळगावमध्ये एसटी कर्मचार्‍यांचा बेमुदत संप सुरु आहे. संप सुरु असल्यापासून गेल्या 70 दिवसांनंतर आता एसटी कर्मचारी संघटना समोर आल्या आहेत. एसटी कर्मचार्‍यांनी कामावर रुजू व्हावे असे अन्यथा नागरिकांच्या सोयीसाठी संघटनेमार्फत बस सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी भूमिका भारतीय एसटी कामगार संघटनेने घेतली आहे. संघटनेच्या या भूमिकेमुळे या संपात आता एसटी.कर्मचारी आणि कर्मचारी संघटना आमनेसामने आल्याचे पहावयास मिळत आहे.

भारतीय कामगार संघटनेची भूमिका काय?

भारतीय एसटी कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. एसटी कर्मचार्‍यांच्या संप तसेच मागण्याबाबत उच्च न्यायालयात कामकाज सुरु आहे. न्यायव्यवस्थेवर कर्मचार्‍यांनी विश्‍वास ठेवावा तसेच नागरिकांचे हाल होत असल्याने उच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कर्मचार्‍यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहन यावेळी राजेश सोनवणे यांनी केले. कर्मचारी कामावर हजर झाल्यावर त्यांचे निलंबन तसेच कारवाई मागे घेण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येईल, उच्च न्यायालयाचा विलिनीकरणाबाबत कर्मचार्‍यांच्या बाजूने निकाला लागला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असेही सोनवणे म्हणाले.

परबांच्या अहंकारामुळे संप चिघळल्याचा आरोप

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अहंकारामुळे हा संप चिघळल्याचाही आरोप राजेश सोनवणे यांनी केला. आंदोलनाला राजकीय किनार प्राप्त झाल्याने भाजप आणि शिवसेनेच्या लढाईत मात्र एसटी कर्मचार्‍यांचा नाहक बळी जात असल्याचा आरोपही यावेळी राजेश सोनवणे यांनी केला. तसेच कर्मचार्‍यांनी राजकीय पक्षांच्या नादी लागू नये, कामावर रुजू व्हावे, बस कर्मचारी कामावर रुजू झाले नाही तर संघटना म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी बससेवा किंवा इतर पर्यायी व्यवस्था सुरु करण्यात येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Corona | नागरीक असो की राजकीय नेते! बेजबाबदारपणा सगळ्यांना अडचणीत आणतोय

ड्रग्स सप्लायरला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; पोलिसांचाही गोळीबार, ‘इंद्रपुरी’मध्ये नेमकं काय घडलं?

CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.