जालना जिल्हा ‘हिरवाई’ने बहरणार; प्रत्येक व्यक्तिमागे तीन झाडे लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जालना जिल्ह्यात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत. (jalna district collector Sets A Target Of Planting Saplings This Year)

जालना जिल्हा 'हिरवाई'ने बहरणार; प्रत्येक व्यक्तिमागे तीन झाडे लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ravindra binwade
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 3:39 PM

जालना: जालना जिल्ह्यात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक व्यक्ती मागे तीन झाडे लावा, असे आदेशच रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. त्यामुळे जालन्यात हिरवाई बहरणार आहे. (jalna district collector Sets A Target Of Planting Saplings This Year)

वृक्ष लागवड मोहिम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, सहाय्यक वनसंरक्षक वन विभाग पी.पी. पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी मोहिते, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा सुर्यवंशी, सहायक गट विकास अधिकारी सिरसाट, वरिष्ट सहाय्यक जाधव, कार्यक्रम व्यवस्थापक एस.आर. देवढे, रोटरी क्लॅब ऑफ जालना रेन्बोच्या अध्यक्षा स्मिता भक्कड, डॉ. हयातकर, पठाडे यांच्यासह रोटरी क्लॅब ऑफ जालना रेन्बो सदस्य अशासकीय संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.

आराखडे तयार करा

05 जुन 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोहीम स्वरुपात जालना जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका व शहरी भागात वृक्ष लागवड कार्याक्रमाचा शुभारंभ करण्यात यावा. रोपांच्या उपलब्धेबाबत वन विभाग व सामाजिक वनीकरण यांनी नियोजन करुन आवश्यकते प्रमाणे रोपे उपलब्ध करुन द्यावीत, असे निर्देश बिनवडे यांनी यावेळी दिले. वृक्ष लागवडीचे ग्रामपंचायतनिहाय सुक्ष्म नियोजन करून आराखडे तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मिळेल तिथे झाडे लावा

वृक्षलागवडीचे काम येत्या पावसळयात करावयाचे असल्यामुळे गावातील, शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध असलेल्या मोकळया जागेत, शेतामध्ये, बांधावर, पडीक जमिनीवर, रस्ता दुतर्फा, कॅनॉल दुतर्फा, नदी व नाले यांच्या काठावर वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेवून गावातील व शहरातील प्रत्येक व्यक्तीमागे किमान 3 झाडे लावण्याकरिता नियेाजनबध्द पध्दतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

अब्दुल सत्तार जालन्यात

दरम्यान, राज्याचे महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जालन्यातील जिल्हा कोव्हीड रुग्णालयाला भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पहाणी केली. तसेच खासगी रुग्णालयाच्या बरोबरीची व्यवस्था असणारे हे रुग्णालय उभारण्यात आल्याने सत्तार यांनी समाधान व्यक्त करत कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा सर्व डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार या सर्व कोरोनायोद्धयांचे आभारही व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, बाला परदेशी, मनिष श्रीवास्तव आदी उपस्थित होते. (jalna district collector Sets A Target Of Planting Saplings This Year)

संबंधित बातम्या:

ऐकावं ते नवलंच! 16 बायकांचा दादला, 150 मुलं; तरीही गुडघ्याला बाशिंग बाधून तयार!

Maharashtra Coronavirus LIVE Update : वर्ध्यातील कडक निर्बंधांत आणखी पाच दिवसांची वाढ

बापरे! म्युकर मायकोसिसमुळे 50 टक्के लोकांचा मृत्यू; महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमध्ये थैमान

(jalna district collector Sets A Target Of Planting Saplings This Year)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.