जालन्यात तुरुंगाच्या 18 फूट भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार

जळगाव : जळगावातील जिल्हा कारागृहातून 18 फूट उंच भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरीच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांनी पहारेकऱ्यांची नजर चुकवून पोबारा केला आहे. कैद्यांच्या पलयानामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेषराव सुभाष सोनवणे (28, रा.भिलवाडी, ता.जामनेर) आणि रवींद्र भीमा मोरे (26, रा.बोदवड) […]

जालन्यात तुरुंगाच्या 18 फूट भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 3:41 PM

जळगाव : जळगावातील जिल्हा कारागृहातून 18 फूट उंच भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरीच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांनी पहारेकऱ्यांची नजर चुकवून पोबारा केला आहे. कैद्यांच्या पलयानामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शेषराव सुभाष सोनवणे (28, रा.भिलवाडी, ता.जामनेर) आणि रवींद्र भीमा मोरे (26, रा.बोदवड) अशी पसार झालेल्या कैद्यांची नावं आहेत.
विशेष म्हणजे, या कैद्यांनी पसार होण्यासाठी चक्क 18 फूट उंच भिंतीवरुन उड्या मारल्या. या घटनेने जिल्हा कारागृह प्रशासनाने प्रचंड खळबळ उडाली असून संशयितांचा कसून शोध सुरु करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी संशयितांना अटक केली होती. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर  5 रोजी पहाटे 5.15 वाजता बॅरेकमधून त्यांना स्वयंपाक करण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.