महिलांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही- मनोज जरांगे पाटील

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. फडणवीस साहेब तुम्हाला सट्टी नाही, तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागल्याचं जरांगे म्हणाले.

महिलांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही- मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 4:46 PM

जालना, दिनांक 3 मार्च 2024 | मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी  पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  याआधी जरांगे यांनी फडणवीस यांच्याकडून मारण्यासाठी षडयंत्र रचलं गेल्याचं म्हटलं होत. सलाईनद्वारे मला मारण्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलेला. अशातच फडणवीसांनी संभाजीनगरमध्ये महिलांच्या आडून हल्ला करण्याचा डाव केल्याचा आरोप केल आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा हल्ल्याचा डाव रचला, असा अंदाज दिसत आहे. त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. मी आता बाहे पडलो आहे, मलाही पाहायचाय कोणता भाजपचा कार्यकर्ता येतो हल्ला करायला हे मला पाहायचं असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

कारण हे जर खोटं असेल तर हा प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरला करायचा होता. छत्रपतींचे विचार आम्हाला सांगायचे की महिलांचा आदर करायला पाहिजे आणि इकडे महिला पाठवता. १० टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याला शोभत नाही. तुम्हाला सट्टी नाही, तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे SIT चौकशीचे आदेश

मनोज जरांगे आता तीन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर परत एकदा मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी याआधी केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली आहे. जरागेंनी पहिल्यांदा आरोप केले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. इतकंच नाहीतर सुरूवातील जेव्हा अंतरावली सराटी येथे  लाठीचार्ज झाला त्याआधी राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये मराठा आंदोलक असल्याचा आरोप केला होता. यावर आता फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.