जालना: शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ, महिलांना मारहाण, सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रकमेवर डल्ला

| Updated on: Dec 25, 2021 | 1:50 PM

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबादमधील पिंपळखुटा गावात शेतवस्तीवर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी महिलांना मारहाण करून, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लूटली

जालना: शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ, महिलांना मारहाण, सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रकमेवर डल्ला
Follow us on

जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जाफराबादमधील पिंपळखुटा गावात शेतवस्तीवर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी महिलांना मारहाण करून, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली. दरम्यान या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जाफराबादमधील पिंपळखुटा गावात शेतवस्तीवर काल मध्यरात्री दरोडा पडला. चार ते पाच दरोडेखोरांनी महिलांना मारहाण करत, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर  डल्ला मारला. दरोडखोरांकडून महिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे. पैसे आणि दागिने लूटून दरोडेखोट घटनास्थळावरून फरार झाले.

दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला जखमी 

दरोडेखोरांनी ऐन मध्यरात्रीच्या सुमारास पिंपळखुटा गावातील शेतवस्तीवर दरोडा घातला. यावेळी घरात असलेल्या महिलांना जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीनंतर चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

संबंधित बातम्या

TET exam Scam : पुणे पोलिसांचा धडाका सुरुच, आश्विन कुमारच्या घरातून 2 किलो सोनं, 24 किलो चांदी जप्त

धक्कादायक! तामिळनाडूमधील शाळेत 15 मुलींचे लैंगिक शोषण, एका शिक्षकाला अटक

तब्बल 29 वर्षांनी मृत पीडितेला मिळाला न्याय; आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सक्तमजुरी