AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची काय दिशा असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल, म्हणाले…

Manoj Jaranage Patil : मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेत वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली होती. जरांगे यांनी यावर आपली काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.

24 डिसेंबरनंतर मराठा आंदोलनाची काय दिशा असणार? मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितंल, म्हणाले...
मनोज जरांगे
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 17, 2023 | 11:31 AM
Share

जालना : मराठा आरक्षणाचा  विषय आणखीनच चिघळत चालला असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सरकारकडून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांची भेटत अल्टिमेटमबाबत विचार करावा असं म्हटलं होतं. २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमचा परत एकदा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे यावर जरांगे सरकारला वेळ वाढवून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहोत. परंतु त्यांना जो 24 डिसेंबपर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे. त्यातला एक घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे. वेळ नाही नाही मी कालच सांगितलं आणि हे मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं असून मी आडून मी चर्चा करत नाही,  असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजच्या लेकरांच्या हिताचा आज निर्णय होणार आहे. आमच्या नोंदी असताना आम्हाला का आरक्षण देत नाही, सरकार का वेठीस धरत आहे. आज 3 वाजेपर्यंत निर्णय होणार आहे, नोंदीच्या आधारे निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या नोंदी मिळल्या आहेत आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत असल्याचंही जरागेंनी सांगितलं.

मी त्यांना सांगितलं, जे उपोषण सोडताना आले होते. त्यावेळी जे कागदावरती लिहिलं होतं, ते फक्त तुम्ही एकदा वाचा. तुम्ही ते वाचलं की तुम्हाला वेळ मागायची गरजच पडणार नाही. कारण तुमच्या हातात आणखीन आठ- दहा दिवस आहेत. त्यामुले तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नसल्याचं जरांगे म्हणाले.

दरम्यान, आता हा शेवटचा लढा आहे त्यामुळं लढूनच आरक्षण मिळवायचं आहे. दमायचा नाही पर्फेक्ट नियोजन काय जे करायचंय ते नियोजनबद्ध निर्णायक ठोस ठरवून चांगली बांधणी करणार असल्याचं जरागेंनी सांगितलं. मराठा संघटना आणि जरांगे यांच्यात 12 ते 3 अशा तीन तास बैठक चालणार आहे यामध्ये  काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा