AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Chakan MIDC Problem: चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते हे वाहतूक करण्या इतपतही योग्य नसल्याने उद्योजक प्रचंड नाराज होते. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे वाहतुकीला रोज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे.

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
| Updated on: Aug 18, 2026 | 9:47 AM
Share

चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते हे वाहतूक करण्या इतपतही योग्य नसल्याने उद्योजक प्रचंड नाराज होते. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे वाहतुकीला रोज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. यावरून उद्योजकांनी नाराजी दर्शवली होती. उद्योजकांच्या नाराजीनंतर प्रत्यक्ष उद्योग मंत्री उदय सामंत ही समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. 16 ऑगस्ट 2026 रोजी चाकणमधील विविध प्रश्नांसंदर्भात एक बैठक पार पडली.

आता हा प्रश्न सोडवण्यासाठी चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल उडलले आहे. राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रिअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार आहे. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल उचलले आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर महत्त्वाच्या एमएसआरडीसी इंडस्ट्रिअल टाऊनशिप ॲक्टमध्ये परावर्तित करणार.  रस्ते, गटारे आणि ड्रेनेजची देखभालही इंडस्ट्रिअल टाऊनशिप अंतर्गतच होणार आहे.  कचरा, अस्वच्छता आणि सार्वजनिक उपद्रव रोखण्याचे अधिकार अथॉरिटीला जाणार. औद्योगिक नगरातील स्ट्रीट लाईट आणि सार्वजनिक प्रकाशव्यवस्था अथॉरिटीच्या अखत्यारित येणार आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने देखील ही व्यवस्था काम करणार आहे. शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करून पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इंडस्ट्रियल टाऊनशिपची गरज आहे. चाकणसोबतच, रांजणगाव, शेंद्रा, वाळूज, तळेगाव, बिडकीनसारख्या महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये सोयीसुविधांसाठी ॲक्ट लागू करण्याचा विचार करत आहे अशी राज्य सरकारमधल्या एका प्रमुख उच्चस्तरीय सूत्रांची माहिती दिली आहे.

चाकण हे महाराष्ट्रातील एक मोठं औद्योगिक केंद्र आहे. यामुळे येथे उद्योजकांना ज्या समस्या भेडसावत आहे त्यावर लवकरात लवकर निर्णय घेणे हे प्रशासनचे काम आहे. येथील उद्योजकांना ज्या पायाभत सुविधांची गरज आहे त्या निर्माण करुन देणार, तसेच त्यांना भेडसवणाऱ्या अडचणी दूर करणे या साठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे, ज्या अडचणी आहेत त्याबद्दल प्रत्यक्षात माहिती घेऊन, त्या -त्या विभागाशी योग्य तो समन्वय साधून या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाई असे विधान उदय सामंत यांनी केले होते.”

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात