पहिल्यांदा इशारा देऊन सोडलं, पुन्हा तीच चूक, आता कारवाई अटळ… जय पवार आक्रमक; कोणावर संतापले?

Jay Pawar News on Purushottam Jagtap: सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ वापरून प्रचार केल्याचा आरोप केल्यानंतर पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचा जय पवारांनी इशारा दिला आहे.

पहिल्यांदा इशारा देऊन सोडलं, पुन्हा तीच चूक, आता कारवाई अटळ... जय पवार आक्रमक; कोणावर संतापले?
| Updated on: Oct 06, 2026 | 5:42 PM

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी जय पवारांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की पुरुषोत्तम जगताप यांवर कारवाई करणार का? या प्रश्नाचे उत्तर आता जय पवारांनी दिले आहे. तसेच पुरुषोत्तम जगतापांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जय पवार म्हणाले की, मला जेव्हा आधी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई करणार का, असे विचारले होते. तेव्हा मी सांगितले की करणार नाही. फक्त त्यांना दादांचे नाव आणि फोटो वापरू नये हे सांगितले होते. पण काल त्यांनी सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ वापरून ते त्यांच्या पॅनेलचा प्रचार करत आहेत.त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यांनी दादांच्या आवाजाचा व्हिडिओ केला आहे. त्यामुळे त्याबाबत ही कारवाई करणार आहे, असं म्हणत जय पवार जगतापांविरोधात आक्रमक झाले आहेत.

Loading...

ते म्हणाले की, पुरुषोत्तम जगतापांना आम्ही सांगितले होते की दादांचे नाव आणि फोटो यांच्या परवानगीशिवाय वापरू नयेत. पुरुषोत्तम जगतापांवर काय कारवाई करणार हे आज सायंकाळपर्यंत कळवू. पुरुषोत्तम जगताप यांच्यासोबत जे गेले आहेत त्यांच्यावर कारवाई करणार नाही. कारण ते जगताप यांच्यामुळे ही सुरूवात झाली. एका व्यक्तीमुळे ते घडले आहे, अशी माहिती जय पवार यांनी दिली आहे.

जय पवार म्हणाले की, अनेक वर्षापासून अजितदादांनी जसा चालवला तसा आम्ही त्या पद्धतीने कारखाना चालवणार आहोत. यात पक्षाचा कोणताही स्वार्थ नाही. ही निवडणूक पक्षाची नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाने शिरकाव केला तसे वाटत नाही. जगताप यांच्यासोबत आम्ही त्या दिवशी बराच वेळ चर्चा केली. २८ तारखेला पुरुषोत्तम जगताप आले. त्यांनी १६ नावे दिली. त्यानंतर आम्ही सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली. २९ तारखेला ते पहाटे २ वाजता भेटले सुनेत्रा पवार देखील होत्या. नवीन पॅनल तयार केले. फायनल केलं होत.

जय पवारांनी सांगितले की, आता पुरुषोत्तम जगताप यांचे दौरे पाहता मला वाटत आहे की त्यांच्या मनात हे अगोदर पासून होतं. आम्ही सर्वसमावेशक असा पॅनल केला आहे. यात उमेश पाटील यांचा रोल नाही. सुनेत्रा पवार यांनी आणि पक्षातील पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हा पॅनल केला आहे. कारखाना कसा व्यवस्थित चालवायचा हा आमचा फोकस आहे. कोणाकडून काही चुकलं तर सुनेत्रा पवार आहेत. आम्ही चुका होऊ देणार नाही, जर तसे काही झाले तर जबाबदारी आमची असेल.

त्यांनी पुढे सांगितले की, आत्ताचा प्रचार पाहता सर्वांचं प्रेम दादांवर आहे. विधानसभा आणि लोकसभेपेक्षा अधिक लोक प्रचारात आहेत. आजूबाजूला मला हसरे चेहरे दिसतात. लोकसभेला सर्वांनी शरद पवारांची साथ दिली. त्याचवेळी तेच लोक आपल्याकडे देखील होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us