दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठवाड्याला अनोखे गिफ्ट, मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मान्यता

| Updated on: Oct 15, 2021 | 6:24 PM

मराठवाड्यातील जनतेला दसऱ्याचे अनोखे गिफ्ट मिळाले आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठवाड्याला अनोखे गिफ्ट, मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मान्यता
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : मराठवाड्यातील जनतेला दसऱ्याचे अनोखे गिफ्ट मिळाले आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. गोदावरी पाणी तंटा लवादातील तरतुदीनुसार दिनांक 6 ऑक्टोबर 1975 पूर्वीच्या मंजूर प्रकल्पांचा पाणी वापर संरक्षित आहे.

19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता

त्यामध्ये पूर्वीच्या मंजूर पाणी वापरात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी महाविकास आघाडी शासनाच्या जलसंपदा विभागाने आता दूर केल्या आहेत. या त्रुटी दूर केल्यामुळे आता मध्य गोदावरी उपखोऱ्यात एकूण 60+ 61.29 = 121.29) टीएमसी पाणी वापराचे नियोजन करणे शक्य आहे. हे लक्षात घेत 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास गुरुवारी मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे.

मराठवाड्यासाठी 121.29 टीएमसी पाणी 

आता 19.29 टीएमसी पाणी वापर मंजूर झाला आहे. याचा अर्थ पूर्वीचे 60 टीएमसी आणि आताचे 61.29 टीएमसी म्हणजे 121.29 टीएमसी पाण्याचा वापर मध्य गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला करता येणार आहे. या निर्णयामुळे बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न व प्रकल्पांचे अडथळे पूर्णपणे दूर झाले आहेत. याचे सर्व श्रेय मराठवाड्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला देईल, अशी खात्री मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत

मागच्या कालखंडात मंत्री जयंत पाटील यांनी या भागात दौरा करत या भागातील प्रकल्पांचे प्रश्न जाणून घेतले होते. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यात जास्तीत जास्त पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची टप्प्याटप्प्याने पूर्तता होत असल्यामुळे नागरिकांना समाधान व्यक्त केलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवड्याकडे वळवण्याचा प्रयत्न

दरम्यान, यापूर्वी  26 सप्टेंबर रोजीी बोलताना जयंत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक येथील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले होते. “जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची वहन क्षमता वाढवणार आहोत. जायकवाडी धरणातील गाळ काढला तर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल,” असे जयंत पाटील म्हणाले होते. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात गोदावरी नदीवर 782 नवे बंधारे उभारण्यात येणार आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या आगामी योजनेबद्दल माहिती दिली होती.

इतर बातम्या :

Chhattisgarh Video | गांजाने गच्च भरलेली कार, तब्बल 20 जणांचा चिरडलं, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

मोदींच्या पावलावर पंकजांचं पाऊल, मंदिर ते हॉस्पिटल्स स्वच्छ ठेवण्याचा संकल्प जाहीर

सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचा पंकजांवर पलटवार