AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचा पंकजांवर पलटवार

भाजप नेत्या यांनी सावरगावत भगवान गडावर धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं.

सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचा पंकजांवर पलटवार
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 5:07 PM
Share

बीड : भाजप नेत्या यांनी सावरगावत भगवान गडावर धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्याने देणं, अशा पद्धतीने आरोप करणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहिती आहे, दोन वर्षात एवढी संकटं असताना मंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काय काम करतोय. त्यामुळे त्यांना काय म्हणावं हे त्यांचा प्रश्न आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.

‘सत्तेत असताना त्यांचं मंत्रिपद त्यांनी कुणाला भाड्याने दिलं होतं का?’

“पंकजा मुंडे यांनी भाषणात एक गोष्ट कबूल केली, त्या मंत्रिपद भाड्याने दिलंय हे बोलल्या. पण त्या मंत्री असताना बीड जिल्ह्यातील आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या असंख्य ऊसतोड मजुरांसाठी त्या मंत्री असताना न्याय देता आलं नाही. त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद त्यांनी कुणाला भाड्याने दिलं होतं का?”, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

‘पंकजांनी कुठलीतरी एक भूमिका घ्यावी’

“पंकजा नेमक्या कोणत्या बाजूने आहेत? त्या सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? कुठलीतरी एक भूमिका घ्यावी. विरोधीपक्ष हा त्यांचाच पक्ष आहे. त्यांचाच पक्ष सरकार पाडायचा प्रयत्न करतोय. ईडी, सीबीआयपासून आयटीपर्यंत जेवढ्या काही केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्या संस्था महाराष्ट्रपुरता केल्या आहेत. महाराष्ट्रात सरकार पाडायचा प्रयत्न केला जातोय. एकीकडे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या पक्षाने वाट्टेल ते प्रयत्न करायचे. दुसरीकडे सरकार पडणार आहे की नाही पडणार याच्या गोंधळात राहायचं. गोंधळात राहू नये. त्यांनी आजपर्यंत अभूतपूर्व संकटाच्या काळात सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?”, असा देखील प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

‘गोंधळलेली परिस्थिती दिसतेय’

“पंकजा यांना सत्ताधारी आणि विरोधकांना सल्ला सल्ला द्यायचा आहे. सल्ला देणारा नेमका कुठेय हे तर कळालं पाहिजे. आपणच विरोधी पक्षात आहात आणि आपण स्वत:च्या पक्षाला म्हणाताय, सत्ताधाऱ्यांनाही बोलाच. एकूण गोंधळलेली परिस्थिती दिसतेय”, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

‘पंकजांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी’

“आम्ही एवढी मदत जाहीर केलीय ते तुम्हाला कमी वाटत असेल तर आपण भाजपच्या सचिव आहात, अनेक राज्यांच्या प्रभारी आहात. तुमची जी ताकद आहे ती वापरुन केंद्रामधून बीड जिल्हा आणि महाराष्ट्राला मदत मिळवून द्या. बाधित शेतकरी आनंदी होईल. आरोप करण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करुन राज्याला वेगळी मदत मिळवून द्या. यापूर्वी केंद्राने वेगळी मदत दिली आहे. मनमोहन सिंह प्रधानमंत्री असताना, शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना विदर्भासाठी केंद्राने एक वेगळं पॅकेज जाहीर केलं होतं. आता बाधित शेतकऱ्यांसाठी काही पॅकेज जाहीर करणार आहात का? केंद्रानेही काहीतरी मदत केली पाहिजे. किंवा त्यांनी केंद्राकडून मदत आणून दिली पाहिजे”, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली.

‘शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदतीची रक्कम पोहोचेल’

दोन वर्ष कोरोना संकटात गेलं. त्या दोन वर्षात अनेक संकंटे पाहिली. आज विजयादशमीच्या निमित्ताने हीच प्रार्थना करतो, दोन वर्षात जी संकंटे पाहिले ती भविष्यात कुणावरही येऊ नये. महाराष्ट्राच्या तमाम जनतेमध्ये सुख-समृद्धीचं, आरोग्याचं आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचा काळ आई जगदंबेने द्यावा. मधल्या काळात महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाने जे अतिवृष्टी, ढगफुटीचं संकट पाहिलं, यापूर्वी पाऊस कधी झाला नाही असा पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुद्धा दसरा साजरा करेल की नाही अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती. आजही शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने 10 हजार कोटींचं पॅकेज राज्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलं. त्याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. एक मंत्री या नात्याने लवरात लवकर जे सरकारने अनुदान आणि पॅकेज जाहीर केलंय ते आपल्या खात्यात जमा होईल. तसेत पीकविमाही लवकर जमा होईल, याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकार आणि मी घेतलीय.

हेही वाचा :

सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?

पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर हे आमदार, खासदार होतील का हो? जानकरांची फटकेबाजी

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.