पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर हे आमदार, खासदार होतील का हो? जानकरांची फटकेबाजी

रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी सावरगावातील भगवान भक्तिगडावर चौफेर फटकेबाजी केली. आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे.

पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर हे आमदार, खासदार होतील का हो? जानकरांची फटकेबाजी
शिवाजी राजा हा ओबीसी होता-महादेव जानकर
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 3:17 PM

बीड: रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी सावरगावातील भगवान भक्तिगडावर चौफेर फटकेबाजी केली. आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. त्या पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. मंत्री येतो आणि जातो. पण नेता कधी मरत नसतो. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का, असा सवाल महादेव जानकर यांनी केला.

पंकजा ताईंना सोडणार नाही

सत्तेसाठी आम्ही भीक मागत नाही. सत्ता येईल पण जाईल. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. भीक मागून सत्ता मिळवणार नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नेता कधी मरू देऊ नका. हा महादेव जानकर मेला तरी चालेल पण महादेव जानकर पंकजाताई तुला सोडणार नाही. 31 मेला गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर केलं होतं, अशी आठवण जानकर यांनी सांगितली.

गोपीनाथ मुंडे नसते तर मेंढरं राखत बसलो असतो

नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही. रक्तातच असावं लागतं. रक्तच असावं लागत. आरशासमोर भाषण केल्याने नेता होत नाही. नकली तर नकली असतो. नेता व्हायला अक्कल लागते. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचा नव्हता. ब्राह्मण ते मुस्लिमांचा होता. भगवान बाबांना जात नव्हती. गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसता तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता. पण, ऊस तोडणाऱ्या माणसााच्या हातात कोयता देण्याऐवजी आयपीएस पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे, असं महादेव जानकर म्हणाले.

काल ओबीसींची एमपीयूपएसीची लिस्ट झाली 272 पैकी 36 पोरं भगवान बाबाच्या जातीची झाली. मंत्रीपदाच्या मांडवा खालून मीही गेलो आहे. एखादा मंत्री आणि आमदार होईल. काय पॉवर आणि काय असंतं आम्हाला माहीत आहे.

पंकजा वाघासारखी नेता

पंकजा मुंडेंनी काय केलं मंत्री सोडून द्या, या देशाचा कारवा कसा चालवावा हे पंकजांनीच दाखवून दिलं. माझा वेळ ताईला देऊ द्या. एखादा मुलगा मेला तरी चालेल आई मरता कामा नये. पंकजा मुंडेही आपली आई आहे.काही लोकं हेमामाालिनीचा मुखवटा लावून येतील पण ती तुमची आई होणार नाही. ती बाई असू शकेल. पंकजा ही आई आहे. ती म्हणते त्यांना निवडून द्या. पंकजा मुंडेंनी सर्वाधिक निधी आणला. मीही निधी दिला. आता बीड जिल्ह्यात निधी नाही, असं महादेव जानकर म्हणाले.

इतर बातम्या:

“तुम्ही उन्हात, आम्ही सावलीत कसं बसावं, हे आघाडीतल्या कार्यक्रमाचं स्टेज नाही,” भगवान गडावर प्रीतम मुंडेंची फटकेबाजी

प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?

Mahadev Jankar appeal to back Pankja Munde for better future of obc

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.