तक्रार बासनात गुंडाळल्याचे दिसत आहे, निवडणूक आयोगावर जयंत पाटलांचा थेट आरोप…

जयंत पाटलांनी गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केली आहेत. जयंत पाटील यांनी म्हटले की, 19 ऑक्टोबरला आम्ही कार्यालयात नेऊन पत्र दिलं. आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाड भेटले. मात्र, निवडणूक आयोगाकडून प्रतिसाद मिळत नाही.

तक्रार बासनात गुंडाळल्याचे दिसत आहे, निवडणूक आयोगावर जयंत पाटलांचा थेट आरोप...
Jayant Patil
| Updated on: Oct 15, 2025 | 2:10 PM

निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीनंतर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने थेट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून निवडणूक आयोगाचे वेबसाईट दुसरे कोणी वापरत असल्याचे त्यांनी म्हटले. पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली. हेच नाही तर विधानसभेच्या निवडणुकी अगोदर मोठे घोळ यादांमध्ये झाल्याचे त्यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी म्हटले. पहिली गोष्ट म्हणजे चॅनलवर एक बातमी येते. खोट्या यादीची. त्यानंतर सहा वाजता गायब होते. तुमच्याकडे तक्रार दिली का विचारलं. पण निवडणूक आयोगाला त्याबद्दल काहीच माहीत नाही. ते म्हणाले, माहिती घेऊन सांगतो.

त्यांच्या वेबसाईटवरून गायब झाली आहे. चॅनलवर दाखवलं. त्या चॅनलवर दाखवल्यावर यादी गायब होत असेल आणि आयोगाला माहीत नसेल तर हे कोण करतंय. हे कोण काढतंय आणि कोण घालतंय हे आयोगाला विचारलं. ते म्हणाले, चौकशी करून सांगतो. जयंत पाटील यांनी म्हटले की, 19 ऑक्टोबरला आम्ही कार्यालयात नेऊन पत्र दिलं. आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाड भेटले. पण त्याची दखल घेतली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला एक महिना आधी विधानसभेच्या पत्र दिलं होतं.

सोयीचे नाव काढतात, गैरसोयीचे नावं काढले जात आहेत. सोयीचे नावे हिरव्या पेनाने मार्क करा आणि गैरसोयीची नावे लाल पेनाने मार्क करण्याचे आदेश देण्यात आले. निवडणूक आयोगाने कोणतीही तक्रार आली की, ती बासनात गुंडाळल्याचं दिसत आहे. सुषमा गुप्ता नालासोपारा. दुपारी 3 वाजता होतं. 6 वाजता गेलं. 12 ऑगस्टची घटना आहे. निवडणूक आयोगाने याची साधी चौकशीही केली नाही. मुरबाड मतदारसंघात घरासमोर फक्त डॅश लिहिलंय.

डॅश असणारी 400 घरे आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 869 मतदार आहे. नाशिकमध्ये 813 मतदार आहे. नाशिकमध्ये 3829 क्रमांचं घर आहे. तिथे 813 मतदार आहेत. सर्व पुरावे आहेत. मी हवेत बोलत नाही. आता हा चेंडू भाजपाच्या कोर्टात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपाने आमच्यासोबत यायला पाहिजे, होते या शिष्टमंडळात असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.