AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग याचा बाप कोण?… उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले, निवडणूक आयुक्त…

उद्धव ठाकरे यांनी नुकताच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटले की, एक गोष्ट सांगेल. एकूणच लोकशाहीसाठी आणि तिच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले.

मग याचा बाप कोण?... उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले, निवडणूक आयुक्त...
Uddhav Thackeray press conference
| Updated on: Oct 15, 2025 | 1:41 PM
Share

राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. यामध्ये राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,मनसे, शेकाप यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारली. हेच नाही तर काही पुरावेही आम्ही निवडणूक आयोगाकडे दिल्याचे त्यांनी म्हटले. जोपर्यंत निवडणूक यादींमधील घोळ दूर होत नाहीत, तोपर्यंत आम्ही निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली आहे. मतदार यादांमधील अनेक त्रुटी आम्ही निवडणूक आयोगाला दाखवल्या. अनेक ठिकाणी दुबार मतदार आढळली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटले की, एक गोष्ट सांगेल. एकूणच लोकशाहीसाठी आणि तिच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले. आम्ही भाजपला पत्र दिलं होतं. आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणुक आयुक्तांच्या भेटीत भाजपकडून कोणी आलं नाही. एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडून राहिला. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या आधी 19 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीने पत्र दिलं होतं. काही भाजपचे कार्यकर्ते या मतदार याद्यांशी खेळत आहेत.

काही लोक त्यांना हवे ते घुसवत आहेत, असं पत्रात लिहिलं होतं. हे पुरावे आहेत. यादी आम्ही घरी नाही छापल्या. एका जागेवर 200-200 लोकांची नावे नोंदवली. निवडणूक घ्यायची असेल तर निष्पक्षपाती झाली पाहिजे. नाही तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करा. तेवढच राहिले आहे. आयुक्तांकडे काही अधिकार आहे की, आम्ही कठपुतळ्यांसोबत बोलत आहोत. वरचे बोलतील तेच करणार आहे. 1 जुलैचा कट ऑफ डेथ. 1 जुलै नंतर 18 वर्ष झालेल्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. ही कोणती लोकशाही.

सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांची केस सुमोटो घेतली होती. तशीच मनुष्य प्राण्यांची ही केस घेतली पाहिजे. लोकशाहीच्या नावाने आयोग हुकूमशाही गाजवत असेल तर गाजवू देणार नाही. दोन्ही आयुक्तांना भेटलो. केंद्राच्या प्रतिनिधींनी सांगितलं की, हा विषय राज्य निवडणूक आयोगाकडे येतो. राज्य आयुक्त म्हणतात मतदार याद्यांचा विषय केंद्राकडे येतो. मग याचा बाप कोण. काल त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आम्ही त्याला विरोध केला. दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणूक नको. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवला.

त्यात कोर्टाने सदोष निवडणूक घ्या असं कुठेही म्हटलं नाही. राज्य निवडणूक आयुक्त म्हणतंय, आम्ही त्यासाठी प्रयत्न करू.आम्ही सत्ताधाऱ्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोर वाटा अडवल्या आहेत. या चोर वाटा आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटले,अमूक तारखेच्या आधी निवडणुका घेतल्या पाहिजे असं काही आयोगाचं म्हणणं नाही. आयुक्त म्हणाले, सकारात्मक विचार करतोय.

आम्ही म्हटलं विचार करून चालणार नाही. या गोष्टी होता कामा नये.जे मतदार हयात आहेत. त्यांचा अधिकार हिरावून घेतला. त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का, ईव्हीएमवर आमचा आक्षेप आहे. महापालिकेच्या निवडणुका ईव्हीएमवर होणार आहे. पण व्हीव्हीपॅट राहणार नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग देणार नाही. त्यामुळे आम्ही हुकूमशाही मान्य करणार नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.