रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ‘एक व्हिडिओ बनवा अन्…’ जयश्री आगवणेंचा सर्वात मोठा आरोप

Jayashri Agawane and Ranjitsinh Naik Nimbalkar: वर्षा आणि हर्षा आगवणे या जुळ्या बहि‍णींच्या सुसाइड नोटमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कथित दबावाचा उल्लेख करण्यात आला होता असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं.यानंतर आता जयश्री आगवणे यांनी निंबाळकर यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, एक व्हिडिओ बनवा अन्... जयश्री आगवणेंचा सर्वात मोठा आरोप
ranjit-singh-naik-nimbalkar
| Updated on: Oct 28, 2025 | 7:44 PM

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. याबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही यामुळे चर्चेत आले आहेत. वर्षा आणि हर्षा आगवणे या जुळ्या बहि‍णींच्या सुसाइड नोटमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कथित दबावाचा उल्लेख करण्यात आला होता असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं. तसेच आज सुषमा अंधारे यांनी निंबाळकर आणि जयश्री आगवणे यांच्यातील एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. यानंतर आता जयश्री आगवणे यांनी निंबाळकर यांच्यावर मोठा आरोप केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाल्या जयश्री आगवणे?

जयश्री आगवणे यांनी म्हटले की, ‘ही ऑडिओ क्लिप 2023 ची आहे. माझ्या पतीला अटक करण्यात अली होती. माझे सासरे मारणाच्या दाढेत होते. रणजितसिह निंबाळकर हे पतीच्या खूप जवळचे होते. मी रणजित दादांना फोन केला की हे मिटवा आणि सोडा. ते म्हणाले मला पण मिटवायचं आहे. पण तुम्ही एक व्हिडिओ बनवा. रामराजे निंबाळकर यांचे नाव व्हिडिओमध्ये घ्या आणि 50 लाख रुपये केसेस साठी दिले असा सांगा.’

पुढे बोलताना जयश्री यांनी म्हटले की, आमचा तसा संबंध रामाराजे यांच्याशी नव्हता. रणजितसिह निंबाळकर यांच्याशी माझ्या पतीचे आर्थिक व्यवहार होते. माझ्या विरोधात गेला म्हणून आमचा कुटूंबाचा वापर रणजितसिह निंबाळकर यांनी केला. आमचे आता घर नाही राहिल. तीन मुले तीन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आहे. बेघर आम्ही झालो आहोत. 2022 साली मुलींनी आत्महत्या केली, कारण त्यांना आधार राहिला नाही. पोलीस गाडी घरी यायची. दबाव टाकला जात होता. जे कोणी माझ्या पतीला मदत करेल त्याला सुद्धा खोट्या केसेस मध्ये टाकल्या जायच्या

आत्ता 50 कोटींची नोटीस मला त्यांच्या वकिलामार्फत मिळाली आहे. राजेश शिंदे आणि रोहित नाकटे हे त्यांचे दोन पीए प्रत्येक केसला बाहेर असतात, दबाव टाकतात. आम्हाला आता डॉक्टर महिलेला न्याय मिळवून द्यायचा आहे. शिवाय मी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती करते की दोन्ही बाजू तुम्ही तपासा. जी काही लढाई आहे माझ्या पतीसोबत आहे. मी रणजीत सिंह यांना मोठा भाऊ मानले. माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका.