AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : गरब्याचा वाद, अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

गरब्यावरून राज्यात राजकारण तापलं; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचं जितेंद्र आव्हाडांनी केलं समर्थन, नेमकं काय म्हणाले?

Jitendra Awhad : गरब्याचा वाद, अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले...
Jitendra Awhad supports Amruta Fadnavis statementImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 6:18 PM
Share

राज्यामध्ये गरब्यावरुन राजकारण सुरु आहे. आता यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गरब्यावरुन व्यक्त केलेल्या मतानंतर आता एनसीपी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. “मी अमृता ताईंचं समर्थन करतो. त्यांचं मनापासून स्वागत करतो की, त्यांनी भूमिका घेतली. याबाबत प्रत्येकाला भूमिका घ्यावी लागणार आहे. दोन समाजात किती द्वेष वाढवायचा. मला वाटतंय याचावर कोणी बोलू नये. दोन समाजात विषारी वातावरण किती करणार? हे देशाचा आणि राज्याचा हेतूने योग्य नाही. हा सर्व मतांच्या ध्रुवीकरणासाठीचा त्यांचा पूर्वीपासून अजेंडा आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवरात्रौत्सवात गरब्याला सुरुवात होईल. त्यावेळी गरब्यांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, ज्यांच्या डोक्यावर टिळा असेल त्यांनाच प्रवेश मिळावा, असे मत कांदिवली मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी माडंले होते. तर अमृता फडणवीस म्हणालेल्या की, “आपला उत्सव सर्वसमावेश आहे. एखादी मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल, तर त्यात काही गैर वाटत नाही.”

दरम्यान, गणेशोत्सवाची कामे गैरहिंदूंना देऊ नयेत, या भाजप नेते अशोक शेळके यांच्या भूमिकेवरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हे बरोबर नाही. असं तुम्ही जर जाती जमातीवर आधारित भूमिका घेऊ लागले तर या देशाला आपण विघटनाकडे नेतोय. समाज एक राहिला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. माझ्या घरी दिवाळी असेल तर दुसरे आपल्या घरी आले पाहिजे. कोणाकडे येशूचा उत्सव असेल तर आपण त्यांच्या घरी जायला पाहिजे. अचानक राजकीय फायद्यासाठी जर हे तुम्ही करू लागलात तर ते योग्य नाही.

याशिवाय आव्हाडांनी यावेळी इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केलं, ओबीसी जनगणनेवर म्हणाले की, “संसदेमध्ये सरकारने शब्द दिला होता पण आता सरकार घाबरतय का? ओबीसी जनगणना का होत नाही? बिहारमध्ये झाली ओबीसी जनगणना, पूर्ण देशात हीच परिस्थिती असेल. ओबीसी जणगणना करायला कशाची भीती आहे .सरकार कोणालाही दाबून टाकते, त्यात काही नवीन नाही. तुम्ही संसदेत शब्द दिलाय तरी देखील तुम्ही पूर्ण का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला.

ब्रिक्समधून काही फायदा होतो की तोटा होतो. नोकऱ्या मिळतील का नाही, महागाई कमी झाली का नाही, बाजारात कुठे काही स्वस्त मिळतंय का नाही, हेही पाहावं लागेलं, असं आव्हाड म्हणालेत.

Follow Us
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया