AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधवा – घटस्फोटीत महिलांचा सीरियल ठग… फक्त लैंगिक अत्याचारच नाही तर…, पोलिसांची मोठी कारवाई

विधवा - घटस्फोटीत महिलांवर फक्त लैंगिक अत्याचार नाही तर, त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारा सीरियल ठग अखेर समोर, कसं झालं पितळ उघडं? पोलिसांची मोठी कारवाई... आरोपीबद्दल मोठी माहिती समोर...

विधवा - घटस्फोटीत महिलांचा सीरियल ठग... फक्त लैंगिक अत्याचारच नाही तर..., पोलिसांची मोठी कारवाई
Crime
| Updated on: Jul 18, 2026 | 12:57 PM
Share

विधवा – घटस्फोटीत आणि ज्या महिलांची मुलं त्यांच्या जवळ नाहीत, अशा महिलांच्या एकटेपणाचा फायदा घेत 48 वर्षीय संतोष तिवारी उर्फ अनुज कुमार त्रिवेदी याने गुन्ह्याचा कळस गाठला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणून कल्याण – डोंबिवलीतून मोठं रॅकेट समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुनगर पोलिसांनी लग्नाचं आमिष दाखवून महिलांकडून कोट्यवधी रुपये उकळण्याऱ्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बऱ्याच काळापासून वैवाहिक संकेतस्थळे आणि जाहिरातींच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात ओढत होता. पोलीस सध्या या संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी Shaadi.com, Matrimonial.com आणि इंग्रजी वर्तमानपत्रातील जाहिरातींच्या माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या विवाहविषयक जाहिरातींच्या आधारे महिलांशी संपर्क साधायचा. तो प्रामुख्याने अशा महिलांना लक्ष्य करायचा, ज्या एकट्या राहत होत्या, विधवा किंवा घटस्फोटित होत्या, अथवा ज्यांची मुलं परदेशात स्थायिक होती. आरोपी आधी महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर लग्नाचं आश्वासन देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करायचा

73 वर्षीय महिलेची 57 लाख रुपयांची फसवणूक

तपासात समोर आल्यानुसार, आरोपीने सर्वात आधी 73 वर्षीय महिलेसोबत मैत्री केली. त्यानंतर तिच्या घरातून सर्व दागिने चोरुन नेले. एवढंच नाही तर, महिलेच्या नावाने एक सिम कार्ड देखील सुरु केला. त्यानंतर पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घर देण्याचं आश्वासन देत याने महिलेला तिचं स्वतःचं घर विकायला लावलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेची तब्बल 57 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

पोलीस तपासात असं देखील समोर आलं आहे की, आरोपी स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी दुसऱ्या महिलांच्या नावाने सीम कार्डचा वापर करायचा. याच कारणामुळे आरोपी पोलिसांच्या नजरेपासून दूर जात होता. दरम्यान, आरोपीने किती महिलांची फसवणूक केली आहे… याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. एवढंच नाही तर, आरोपीने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे.

विष्णूनगर पोलीस जवळपास वर्षभरापासून या आरोपीचा शोध घेत होते. अखेरीस, तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील सीतापूर येथून अटक केली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपीने आणखी किती महिलांची फसवणूक केलीये.. याचा देखील पोलीस कसून शोध घेत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...