
Kalyan Dombivli Election Result : राज्यात एकूण 29 महापालिका निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत बहुसंख्य जागांवर भाजपाने बाजी मारली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कोण विजयी होणार तसेच कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची महायुती यांचा महापौर बसणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड अशा महत्त्वाच्या पालिकांमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीला भाजपा 90 पेक्षा जास्त जागांवर विजयी होऊ शकतो, असे सांगितले जात होते. परंतु रात्री आकडे फिरले आणि भाजपाला एकहाती बहुमत गाठता आले नाही. तसेच काँग्रेसच्या जागा मात्र चांगल्याच वाढल्या. दरम्यान, असाच काहीसा प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. इथे अचानकपणे आकडे फिरले असून भाजपाचे टेन्शन वाढले आहे. या महापालिकेच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक निकालात अगोदर भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. या ठिकाणी भाजपाचा एकहाती विजय होतो की काय, अशी स्थिती होती. विशेष म्हणजे या महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची चांगली ताकद आहे. परंतु निकालाच्या सुरुवातीला शिंदे यांच्या पक्षाचं टेन्शन वाढलं होतं. परंतु निकालाचा कल रात्री चांगलाच बदलला आणि भाजपाच्या जागा धाडकण खाली आल्या.
Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...
BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...
BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?
बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
सध्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एकूण 52 जागा मिळाल्या आहेत. ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा 10 जागांवर विजय झाला आहे. काँग्रेसचा दोन तर मनसेचा 5 जागांवर विजय झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला एका जागेवर बाजी मारता आली आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र 122 पैकी 48 जागांवर विजयी पताका फडकावला आहे. कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापन करायची असेल तर एका पक्षाला 61 हा जादुई आकडा पार करावा लागतो. परंतु या महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे अगोदर जास्त जागा निवडून येण्याची शक्यात असलेल्या भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत तर शिंदे यांच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे. त्यामुळे इथे महापौर कोणाचा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले
आहे.