AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये थरार! आरपीएफ जवान बनला देवदूत… ट्रेन-प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या वृद्धाला वाचवलं

Kalyan : रेल्वे स्थानकावर घाईगडबडीत चालती ट्रेन पकडणं किती जीवावर बेतू शकतं, याचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकावर आला आहे. धावती ट्रेन पकडणाऱ्या एका वृद्धाचा जीव थोडक्यात वाचला आहे.

कल्याणमध्ये थरार! आरपीएफ जवान बनला देवदूत... ट्रेन-प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या वृद्धाला वाचवलं
Kalyan News
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 08, 2026 | 9:05 PM
Share

मुंबई लोकलमधील गर्दी पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. रेल्वे स्थानकावर घाईगडबडीत चालती ट्रेन पकडणं किती जीवावर बेतू शकतं, याचा प्रत्यय कल्याण रेल्वे स्थानकावर आला आहे. 6 एप्रिलच्या रात्री पुणे–सतरागाछी हमसफर एक्सप्रेसमध्ये चढताना एका वृद्ध प्रवाशाचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या फटीत अडकला. मात्र, तिथेच ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवानांनी चित्तथरारक प्रसंगावधान राखत या प्रवाशाचा जीव वाचवला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून जवानांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याण स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना

कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 6 एप्रिल रोजी रात्री 9:36 च्या सुमारास काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ट्रेन क्रमांक 20821 पुणे-सतरागाछी हमसफर एक्सप्रेस स्थानकावरून सुटत असताना, 63 वर्षीय अश्विनी कुमार बर्वे हे प्रवासी धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याच वेळी त्यांचा ताबा सुटला आणि ते ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मधल्या जीवघेण्या फटीत लटकले.

जवानांनी वाचवले वृद्धाचे प्राण

या घटनेवेळी प्लॅटफॉर्मवर तैनात असलेले आरपीएफचे प्रधान आरक्षक गजानन अंभोरे आणि एमएसएफ जवान विशाल जाधव यांनी ही परिस्थिती पाहताच क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली. आपल्या जीवाची पर्वा न करता दोन्ही जवानांनी प्रवाशाला ओढून सुरक्षितपणे बाहेर काढले. यानंतर आता गजानन अंभोरे आणि विशाल जाधव या दोघांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

प्रवाशांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारअश्विनी कुमार बर्वे हे छत्तीसगडमधील बिलासपूरचे रहिवासी आहेत. ते चहा पिण्यासाठी खाली उतरले होते, परंतु गाडी सुरू झाल्याने घाईघाईत चढताना त्यांचा पाय घसरला. मृत्यूच्या दारेतून बाहेर काढल्याबद्दल त्यांनी गजानन अंभोरे आणि विशाल जाधव या जवानांचे डोळ्यांत पाणी आणून आभार मानले. तर आरपीएफच्या ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत जवानांनी दाखवलेल्या या साहसाची आणि सतर्कतेची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?