AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 15 दिवसांसाठी कल्याणमधील महत्त्वाचा पूल बंद राहणार, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काय?

वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहनचालकांना पुलावर अजिबात गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे.

पुढील 15 दिवसांसाठी कल्याणमधील महत्त्वाचा पूल बंद राहणार, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काय?
| Updated on: Sep 28, 2025 | 10:01 AM
Share

कल्याण शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा शहाड उड्डाण पूल दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामासाठी तब्बल १५ दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) पुलाच्या सांध्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पुलावरून कोणत्याही वाहनाला वाहतूक करता येणार नाही. पावसामुळे पुलाच्या सांध्यांमध्ये गळती सुरू झाली होती आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, ज्यामुळे रोज वाहतूक कोंडीचा त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

शहाड पूल बंद असल्यामुळे कल्याण – मुरबाडमार्गे माळशेज घाट, जुन्नर आणि नगरकडे जाणारी मुख्य वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे. तसेच, कल्याण तालुक्यातील म्हारळ, मुरबाड हद्दीतील नोकरदार, व्यावसायिक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडे भाजीपाला, फळे घेऊन येणाऱ्या वाहनांनाही मोठा फटका बसणार आहे. वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करून वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहनचालकांना पुलावर अजिबात गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे.

वाहतुकीसाठी जाहीर केलेले पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे

१. मुरबाड – माळशेज घाटाहून येणारी वाहने –  बारवी डॅम फाटा येथे प्रवेश बंद असेल.

या वाहनांनी बदलापूर रस्ता → बदलापूर → पालेगाव → नेवाळी नाका → मलंगगड रस्ता → लोढा पलावा/शीळ डायघर/पत्रीपूल मार्गे पुढे प्रवास करावा.

२. मुरबाड तालुक्यातून शहाड पुलाकडे येणारी वाहने – दहागाव फाटा (रायता गाव) येथे प्रवेश बंद असेल.

या वाहनांनी रायता गाव → वाहोली → मांजर्ली → बदलापूर → पालेगाव → नेवाळी नाका → पत्रीपूल मार्गे पुढे प्रवास करावा.

३. कल्याण, भिवंडी, ठाणेकडून मुरबाडकडे जाणारी वाहने – दुर्गाडी पूल येथे प्रवेश बंद असेल.

या वाहनांनी दुर्गाडी पूल → गोविंदवाडी वळण → पत्रीपूल → चक्कीनाका → नेवाळी नाका → पालेगाव → बदलापूर मार्गे मुरबाडकडे प्रवास करावा.

शहाड पुलावरुन वाहतूक करणे टाळा

अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता, अवजड वाहनांना पर्यायी मार्गांवर सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते १० या वेळेत प्रवेश बंद असणार आहे. यामुळे कल्याणकरांनो, पुढील पंधरा दिवस शहाड पुलावरुन वाहतूक करणे टाळा, अन्यथा तुम्ही वाहतुकीच्या कोंडीत अडकाल. यामुळे वाहनधारकांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?