AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-शिळ रोडने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पुढील 20 दिवस बंद; पर्यायी मार्ग कोणते?

कल्याण-शिळ रोड बंद राहणार आहे. यामुळे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. पोलिसांनी अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना सूट दिली आहे. वाहनचालकांनी संयम बाळगावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण-शिळ रोडने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पुढील 20 दिवस बंद; पर्यायी मार्ग कोणते?
kalyan traffic
| Updated on: Aug 12, 2025 | 9:59 AM
Share

गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी मेट्रोची काम सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता कल्याण-शिळरोड वरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढील २० दिवसांसाठी कल्याण शिळ रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या ११ ऑगस्टपासून २१ ऑगस्ट असे २० दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

कल्याण शिळ रोडवर मेट्रो १२ चे गर्डर बसवण्यात येणार आहे. या मेट्रोच्या कामासाठी हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी काही विशेष वाहतूक बदल जाहीर केले आहेत. यानुसार येत्या ११ ते २० ऑगस्ट दरम्यान रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत कल्याणच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड आणि हलक्या वाहनांना मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक दरम्यान प्रवेश बंद असेल. त्यानंतर, २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान शिळच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना रात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत सुयोग हॉटेल, रिजेन्सी अनंतम चौक येथे प्रवेश दिला जाणार नाही.

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल २० दिवस हा रस्ता बंद असल्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. या काळात पर्यायी मार्गांचा वापर करणे अनिवार्य असेल. आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त कल्याण डोंबिवलीकरांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता

पोलिसांनी प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या काळात कल्याण-शिळ रोड वापरणाऱ्या प्रवाशांनी रात्रीच्या वेळी प्रवासाचा विचार करताना वेळ व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः, ज्यांना रात्री उशिरा प्रवास करायचा आहे, त्यांनी पर्यायी मार्गांची आधीच माहिती घेऊन ठेवावी. मात्र, या नियमातून पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. या मोठ्या बदलांमुळे शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी गाडी चालवताना संयम बाळगावा, तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.