AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘….अन्यथा मराठी तरुणांची फक्त डोकी फुटतील’; राज, उद्धव ठाकरे युतीसंदर्भात बड्या नेत्याचं मोठं भाकीत

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

'....अन्यथा मराठी तरुणांची फक्त डोकी फुटतील'; राज, उद्धव ठाकरे युतीसंदर्भात बड्या नेत्याचं मोठं भाकीत
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 20, 2025 | 6:14 PM
Share

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावत प्रतिक्रिया देताना माजी शिक्षक आमदार कपील पाटील यांनी ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकं काय म्हणाले कपील पाटील? 

‘ठाकरे नावाचं गारुड महाराष्ट्राच्या समाज मनावर आहे. नाकारण्याचं काहीच कारण नाही. पण दोन भावाचं भांडण संपल्याने,  महाराष्ट्राचा, मराठीचा प्रश्न सुटेल का ? मुंबई बाहेर फेकला गेलेला, बदलापूर – नालासोपारा – पनवेलला विस्थापित झालेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत येईल का ? गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना मुंबईत घर मिळेल का ? सत्ता असूनही गेल्या 25 वर्षात आजारी पडलेली बीएमसी हॉस्पिटलं बरी होतील का ? पालिकेतली कंत्राटं मराठी माणसाला मिळतील का ? राज ठाकरेंनी सर्वच पक्षातल्या मराठी जनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे आणि संदीप देशपांडे यांनी जी खंत व्यक्त केली आहे, त्याचं काय?

मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का? मान्य करा न करा, निवडणूकीत लोक मान्यता मिळालेले सामान्य बहुजन शिवसैनिकांचा चेहरा बनलेले एकनाथ शिंदे, कोकणी माणसाचे नारायण राणे, ओबीसींचा आवाज छगन भुजबळ, हे तर मूळ शिवसैनिकच. मग ते का नकोत ? मराठी बोलणारा मुसलमान, वसईचा ख्रिश्चन, जरांगे पाटलांचा गरजवंत मराठा आणि आंबेडकरांचा बौद्ध समाज हे सर्व मराठीच्या परिघात येत नाहीत का ? तामिळनाडूत हिंदूच राहतात. पण हिंदुत्ववादी राजकारणाला त्यांनी थारा दिला नाही. म्हणून ते टिकले. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी राजकारणाने मराठी भाषिकांचं राजकारण आणि महाराष्ट्र धर्मही बुडवला. त्याचं काय ? एकत्र येऊन या प्रश्नांना उत्तरं मिळणार असतील तर स्वागतच. अन्यथा मराठी तरुणांची डोकी फक्त फुटतील.’ असं ट्विट कपील पाटील यांनी केलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?