Sadabhau Khot : बेसुमार वृक्षतोडीवर राज्यात प्रचंड संताप, पण सदाभाऊ खोत यांची वेगळी भूमिका ते म्हणतात चीन आपल्यापुढे चाललाय

Sadabhau Khot : सध्या टोरंट प्रकल्पाच्या वृक्ष तोडीवरुन राज्यात प्रचंड संताप आहे. एक मोठं आंदोलन उभं राहण्याच्या तयारीत आहे. पण शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची वेगळी भूमिका आहे.

Sadabhau Khot : बेसुमार वृक्षतोडीवर राज्यात प्रचंड संताप, पण सदाभाऊ खोत यांची वेगळी भूमिका ते म्हणतात चीन आपल्यापुढे चाललाय
Sadabhau Khot
| Updated on: Oct 27, 2026 | 3:33 PM

सध्या टोरंट प्रकल्पावरुन राज्यात मोठ वादळ निर्माण झालं आहे. या टोरंट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. कर्जतमधील भीमा शंकरच्या जंगलात आतापर्यंत 2 हजार 75 झाडे तोडल्याचा दावा करण्यात येतोय. राज्यातील विरोधी पक्षांसह पर्यावरण प्रेमी या वृक्ष तोडीवर संताप व्यक्त करतायत. आंदोलनं सुरु आहेत. येत्या 28 तारखेला राज ठाकरे कर्जतमध्ये जाणार असून तिथे ते सभा घेणार आहेत. टोरंट प्रकल्प नको अशीच सर्वांची भूमिका आहे. पण भाजपच्या पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांचं मात्र वेगळं मत आहे. “टोरंट प्रकल्पाबाबत चुकीची माहीती दिली जात आहे, हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे” असं माधुरी मिसाळ म्हणाल्या.

“वीज ऊत्पादनासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. प्रकल्प आला तर अनेक जिल्ह्यातील तालुक्यातील वीजेचा प्रश्न मार्गी लागेल, रोजगार मिळेल. विरोधकांची मनधरणी करण्याचा प्रसत्न करू, पर्यावरणवाद्यांना आमचं सांगणं आहे की सरकारवर विश्वास ठेवा. सरकारची विकास करण्याची मानसिकता आहे. कोस्टल, अटल सेतू , समृद्धी हायवे हे सगळे विकासानंतर लोकांच्या वापरात आले तसंच या प्रकल्पाचही होईल” असं माधुरी मिसाळ म्हणाल्या.

Loading...

सगळं गुजरातशी जोडायचं

“संजय राऊत हे केवळ आरोप करतात. त्यात काही तथ्य नाही. विकास केला नाही तर उद्योग गुजरातला पळवल्याचे आरप आणि केला तर विरोध करायचा, आरोप करायचे, सगळं गुजरातशी जोडायचं. हा प्रकार योग्य नाही” असं माधुरी मिसाळ म्हणाल्या. पुण्यातील जागा ह्या स्मिता जाधव जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे असं माधुरी मिसाळ म्हणाल्या.

लवासा झाला तेव्हा वृक्षतोड झाली नाही का ?

“राज्यात उद्योग आला की विरोध, बाहेर गेला की विरोध. राज्याला वीजेची गरज आहे. जी वृक्षतोड होणार ती झाडे लावली जाणार, चीन पुढे जात आहे आपल्यापेक्षा, टोरंटप्रकरणी सरकारने खंबीर राहावं” असं सदाभाऊ खोत म्हणाले.”लवासा झाला तेव्हा वृक्षतोड झाली नाही का ? धरणं होताना वृक्षतोड होत नाही का ? प्रकल्पाला विरोध करण्याचं काम नाही” असं माधुरी मिसाळ म्हणाल्या. “महायुती निश्चितपणे शिक्षक मतदार संघात आघाडी घेईल, पुण्यातून पदवीधर मतदार संघात स्मिता जाधव या विजयी झाल्यात. त्यांचा निकाल आत्ताच सांगतो” असं सदाभाऊ खोत म्हणाले.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us