Sunil Lahri : भ्रष्टाचारामुळे फसवणूक…’एक्सप्रेस वे’च्या दुरावस्थेवर सुनील लहरींचा संताप, नितीन गडकरींचा उल्लेख करत म्हणाले…
Sunil Lahri Post : सुनील लहरी यांनी 'एक्स्प्रेस वे'च्या दुरवस्थेवर सुनील लहरी यांनी संताप व्यक्त केला आहे.

रामानंद सागर यांची लोकप्रिय टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी हे सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा एका गंभीर विषयावर भाष्य केलं आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर त्यांना एक अत्यंत वाईट अनुभव आल्याचं अभिनेत्यानं सांगितलं. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला असून कारवाईची मागणी केली आहे.
सुनील लहरी यांची पोस्ट
सुनील लहरी यांनी सुरुवातीला एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, ‘मला नुकतीच मुंबई-दिल्ली सुपर द्रुतगती मार्गावरून गाडी चालवण्याची संधी मिळाली. यावेळी मला खूप वाईट वाटलं. हा रस्ता अजून खुलाही झालेला नाही आणि तो पूर्णपणे खराब झाला आहे. ट्रक चालक त्यांच्या लेनऐवजी दुसऱ्या लेनमधून गाडी चालवत आहेत आणि कारचालकांना पुढे जाता येत नाही. अशा परिस्थितीत लोक आपलं काम कसं करू शकतील आणि अपघात कसे टाळू शकतील?’
‘मी आमचे परिवहन मंत्री, श्री. गडकरी यांना विनंती करतो की, त्यांनी प्रथम कंत्राटदारावर बंदी घालून त्याला दंड ठोठावावा आणि दुसरं म्हणजे, ट्रक चालकांना दंड ठोठावून त्यांचे परवाने रद्द करावेत. मला आशा आहे की, ते माझी ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतील.’ असं सुनील यांनी शेवटी म्हटलं आहे.
भ्रष्टाचार के कारण ठगा हुआ महसूस करते हैं। माननीय मंत्री जी और संबंधित विभाग से अनुरोध है कि इस मामले की जांच करें और जिम्मेदार लोगो को दंडित करें तथा वाणिज्यिक वाहन चालकों को भी निर्देश दें कि वे नियमों का पालन करें एक्सप्रेसवे,हाईवे पर।ईंधन,समय बच सके,दुर्घटना से भी बचा जा सके https://t.co/9A7xyR78rb
— Sunil lahri (@LahriSunil) October 26, 2026
सुनील लहरी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘भ्रष्टाचारामुळे माझी फसवणूक झाल्यासारखं मला वाटतं. मी माननीय मंत्री आणि संबंधित विभागाला विनंती करतो की, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार लोकांना शिक्षा करावी आणि व्यावसायिक वाहन चालकांना द्रुतगती मार्ग व महामार्गांवरील नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत. यामुळे इंधन आणि वेळेची बचत होईल, तसेच अपघातही टाळता येतील.’
दरम्यान, सुनील लहरी हे रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेतील लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत, ही मालिका १९८७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली होती. अरुण गोविल यांनी प्रभू रामाची, तर दीपिका चिखलिया यांनी माता सीतेची भूमिका साकारली होती.
