AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर, संकेत काय? टेन्शन कुणाला?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. या ऐतिहासिक भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तिन्ही नेते काय बोलणार, कोणती राजकीय टोलेबाजी होणार, आणि याचे काय संकेत असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर, संकेत काय? टेन्शन कुणाला?
Devendra FadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 3:30 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिन्ही नेते एकत्र येण्यामागे काही राजकीय संकेत तर नाही ना? अशा चर्चा रंगल्या आहेत. पहिल्यांदाच हे तीन नेते एकत्र येणार असल्याने तर्कवितर्कांना उधाणही आलं आहे. तसेच हे तिन्ही नेते काय बोलणार? एकमेकांवर टीका करणार की एकमेकांची स्तुती करणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तीन प्रमुख राजकीय नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच कार्यक्रमात येण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. येत्या गुरुवारी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हे तिन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हे पुस्तक संपादित केलं आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात १८८० पासूनचा प्रवास रेखाटण्यात आला आहे.

फटकारे आणि कोट्या

राज ठाकरे हे राजकारणी आणि व्यंगचित्रकार आहेत. तर उद्धव ठाकरे हे सुद्धा राजकारणी आणि फोटोग्राफर आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील आणि मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळे हे तिन्ही नेते एकाच मंचावर आल्याने फटकारे, कोट्या आणि हशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी राजकीय टोलेबाजी होण्याची शक्यताही आहे. तसेच राज ठाकरे हे व्यंगचित्रांचा इतिहास आणि त्यातील बारकावेही मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

म्हणून चर्चा…

सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन, एसआयआर, कर्जतमधील वृक्षतोड आणि मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला ऐकवलेली कथित ऑडिओ क्लिप यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. त्यामुळे गुरुवारी हे तिन्ही नेते या मुद्द्यांवर काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?