AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदिवासी महिला रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध पडली; झोळीत टाकून पोलिसांची चार किलोमीटर पायपीट

डोंगरालगत गाडी उभी करुन सर्व जणांनी पायपीट करत डोंगराळ भागातील रेल्वे ट्रॅक गाठला. | Railway police saves tribal women

आदिवासी महिला रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध पडली; झोळीत टाकून पोलिसांची चार किलोमीटर पायपीट
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 3:10 PM
Share

मेहबुब जमादार, रायगड: कर्जत ते लोणावळा घाटमार्गातील रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध पडलेल्या एका आदिवासी महिलेला पोलिसांनी जीवनदान दिल्याची घटना समोर आली आहे. कर्जत रेल्वे पोलिसांनी डोंगराळ भागातून चार किलोमीटरची पायपीट करुन या महिलेचा जीव वाचवला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांचे कौतुक होत आहे. (Karjat Railway Police saves tribal women near karjat Lonavala railway track)

कर्जत रेल्वे पोलीसांना कंट्रोल रुममधून पळसदरी ते खंडाळा या घाटातील रेल्वे ट्रॅकशेजारी एक महिला निपचित पडून असल्याचा संदेश मिळाला होता. लागलीच कर्जत रेल्वे पोलीसचे पोलीस निरिक्षक अविनाश आधंळे यांनी PSI सरकाळे यांच्या सोबत रेल्वे पोलीस GRP, RPF व होमगार्ड ची एक टीम ईर्टीगा गाडी घेऊन तात्काळ घटनास्थळी रवाना केली. सुरुवातीला हे सर्व पोलीस दल पळसदरी स्थानकापर्यंत गेले.

परंतु तेथुन घाट सुरु होत असल्याने रेल्वे ट्रॅक व्यतिरिक्त वाहनाचा रस्ता नसल्याने पुन्हा वाहन चालकाने खोपोली कर्जत पळसदरी मार्गे रोडने खोपोली – कर्जत रेल्वे मार्गावरील केळवली स्टेशन गाठून तेथे डोंगरालगत गाडी उभी करुन सर्व जणांनी पायपीट करत डोंगराळ भागातील रेल्वे ट्रॅक गाठला. तेथून लोणावळा दिशेला साधारण चार किमी पायी चालत गेल्यावर 106/12 ते 106/14 किमी दरम्यान एक आदिवासी महिला मिडल लेनच्या ट्रॅकवर बेशुद्धावस्थेत पडलेली दिसून आली.

आजूबाजूला वस्ती नसल्याने पोलिसांनी महिलेला झोळीत टाकले

ही जागा डोंगराळ भागात असल्याने आसपास गाव किंवा कोणतीही वस्ती नव्हती. मात्र, महिलेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे होते. तेव्हा रेल्वे पोलिसांच्य पथकाने केळवली रेल्वेस्थानकाजवळ रुग्णवाहिका मागवून घेतली. त्यानंतर एक झोळी बनवून या महिलेला चार किलोमीटरची पायपीट करुन पोलिसांनी केळवली स्थानकापर्यंत आणले. येथून महिलेला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात ही महिला शुद्धीत आल्यानंतर तिची ओळख पटली आहे. या महिलेचे नाव आशा वाघमारे असून ते कार्ला-इरगाव येथे राहणारी आहे. लोणावळा रेल्वे पोलीसांचे पथक पोलीस नाईक जाधव हे कर्जतला आले व कर्जत पोलीसांनी लोणावळा GRP कडे सदर महीलेचा ताबा दिला. सदर महीला लाकड गोळा करणारी आदिवासी महिला होती, असे पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी दिली.

31 मे रोजी सदरची घटना घडली होती. ही कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक टि एन सरकाळे, पोलीस शिपाई निकेश अनंता तुरडे, पोलीस शिपाई मंगेश पाडुंरग गायकवाड, पोलीस नाईक ज्ञानेश्वर खंडु गांगुर्डे, कोडींराम बनसोडे पोलीस काँन्स्टेबर RPF, तसेच होमगार्ड वि डी लोभी यांचा समावेश होता.

(Karjat Railway Police saves tribal women near karjat Lonavala railway track)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...