कोरोनाच्या विचाराने कित्येक रात्र झोप आली नाही, कारकिर्दीतील हा सर्वाधिक तणावाचा काळ : केडीएमसी आयुक्त

केडीएमसीच्या शेवटच्या महासभेत कोरोना संकट काळात चांगली कामगिरी करणारे आयुक्त विजय सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला (KDMC corporaters appreciate work of commissioner Vijay Suryawanshi).

कोरोनाच्या विचाराने कित्येक रात्र झोप आली नाही, कारकिर्दीतील हा सर्वाधिक तणावाचा काळ : केडीएमसी आयुक्त

ठाणे : “कोरोना संकटाचा काळ हा माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक तणावाचा काळ होता. सुरुवातीला संकटावर मात कशी करणार, या विचाराने कित्येक रात्र झोप येत नव्हती”, अशी प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिली. केडीएमसीच्या महासभेत विजय सुर्यवंशी यांचा सर्व नगरसेवकांकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते (KDMC corporaters appreciate work of commissioner Vijay Suryawanshi).

“कोरोना संकटाशी दोन हात करताना आमची यंत्रणा, आयएमए डॉक्टर, सर्व नगरसेवक, सर्व आमदार यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य मिळाले”, असं विजय सुर्यवंशी म्हणाले (KDMC corporaters appreciate work of commissioner Vijay Suryawanshi).

केडीएमसी नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आला. सोमवारी (9 नोव्हेंबर) शेवटच्या महासभेत कोविड काळात चांगली कामगिरी करणारे आयुक्त विजय सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. ही महासभा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या महासभेत सन्मान केल्यानंतर आयुक्त विजय सुर्यवंशी भावूक झाले.

“हा माझा सन्मान नाही. हा संपूर्ण प्रशासनाचा सन्मान आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी जीवावर उदार होऊन कोविड काळात काम केले. त्यामुळे केडीएमसी क्षेत्रात कोरोना कमी होत आहे”, असं विजय सुर्यवंशी म्हणाले.

केडीएमसीत आतापर्यंत 50 हजार कोरोनाचबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं आहे. आयुक्तांच्या नेतृत्वात आरोग्य यंत्रणा तोकडी असताना तात्पुरत्या स्वरुपाची सुसज्ज कोव्हिड रुग्णालये उभारण्यात आली. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी आयुक्त विजय सुर्यवंशी यांचं कौतुक केलं.

दरम्यान, केडीएमसी लोकप्रतिनिधींचा कार्यकाल 11 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. आज सोमवारी महापालिकेची शेवटची महासभा ऑनलाईन पार पडली. या महासभेत सहा विषय मंजूर झाले. शेवटच्या महासभेत उपस्थित नगरसेवकांसह सभागृह नेते प्रकाश पेणकर, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, भाजप गटनेते शैलैश धात्रक, मनसे गटनेते मंदार हळबे, भाजप विरोधी पक्ष नेते राहूल दामले हे उपस्थित होते.

हेही वाचा : मी डॉक्टर नसलो तरी इंजेक्शन देतो, इंजेक्शन देता आलं पाहिजे, पण तुम्ही देऊ नका : मुख्यमंत्री

Published On - 11:00 pm, Mon, 9 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI