AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : कोण होता केतन अग्रवाल? ज्याला होणाऱ्या बायकोनेच 350 ते 400 फूट खोल दरीत ढकललं

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल याच्या निधनानंतर कुटुंबियांना फार मोठा धक्का बसला आहे. केतन याचे आई - वडील तर पूर्णपणे कोलमडून पडले आहे. तर जाणून ज्याची होणाऱ्या पत्नीने लग्नाआधीच हत्या केली, तो केतन अग्रवाल आहे तरी कोण?

Ketan Agarwal Murder Case : कोण होता केतन अग्रवाल? ज्याला होणाऱ्या बायकोनेच 350 ते 400 फूट खोल दरीत ढकललं
| Updated on: Jun 24, 2026 | 1:39 PM
Share

Ketan Agarwal Murder Case : पुणे येथे झालेल्या केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर प्रेम, लग्न आणि जोडीदारावर विश्वास ठेवायचा का? यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण साखरपुड्यानंतर ज्या केतन सोबत, सिया गोयल फिरत होती, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट तरत होती, तिच केतन याचा काळ बनून येईल असं कोणाला वाटलं देखील नसेल. मिळालेल्या माहितीनुसार, सिया 18 जून रोजी केतन याला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. तेथे फोटो काढण्यात व्यक्त असलेल्या केतन याला सिया हिने बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीने तब्बल 350 ते 400 फूट खोल दरीत ढकललं. यामुळे केतन याच्या कुटुंबियाचा मोठा आधार हरपला आहे… जाणून ध्या कोण होता केतन अग्रवाल आणि काय काम करायचा?

केतन याच्याबद्दल समोर येत असलेल्या माहितीनूसार, केतन ‘सक्सेस ग्रुप’ या कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायाचा संचालक तसेच ‘चीफ मार्केटिंग ऑफिसर’ (CMO) होता. केतन पुणे येथे कार्यरत होता. केतन याने ‘बॅब्सन एफ.डब्ल्यू. ओलिन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस’मधून उद्योजकतेमध्ये (Entrepreneurship) ‘मास्टर ऑफ सायन्स’ची पदवी प्राप्त केली होती. त्याच्याकडे ‘सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी’ची BBA पदवी देखील होती.

केतन अग्रवाल याच्या LinkedIn प्रोफाईलनुसार, ते शाश्वतता आणि नाविन्यपूर्णतेसाठी कटिबद्ध होता; त्याचप्रमाणे ते अशा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत होता, जे केवळ आर्थिक विकासाला चालना देत नाहीत तर हरित भविष्यासाठीही योगदान देतात. अशात कुटुंबाने उभ्या केलेल्या व्यवसायाला पुढे घेऊन जाणं, हेच केतन याचं स्वप्न होतं… पण नियतीच्या मनात असं काही भयानक लिहिलं असेल असं कोणाला वाटलं देखील…

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी FIR दाखल

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. यामध्ये केतन याचे वडील देवीचंद अग्रवाल यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत अनेक हैराण करणारे दावे केले आहेत. दाखल तक्रारीनुसार, सिया आणि केतन कायम एकमेकांना भेटायचे आणि फिरायला जायचे. पण काही दिवसांनंतर सिया हिच्या वागणुकीत बदल झाल्याचं केतन याने कुटुंबियांना सांगितलं होतं.

केतन याच्या बहिणीला आलेला संशय

प्रकरणाची माहिती देत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुख्य संशयित सिया गोयल हिने केतनच्या अंत्यसंस्कारांनंतर चार दिवसांनी त्याच्या घरी भेट दिली होती. या भेटीदरम्यान, केतन याच्या बहिणीने तिला (सिया) काही प्रश्न विचारले आणि तिची उत्तरे संशयास्पद वाटली; या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुपचूपपणे तपास सुरू केला.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा