AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कॅप्टन खरातची एपस्टिनसोबत तुलना, संजय राऊत यांचा घणाघात, म्हणाले, जगात आणि राज्यात…

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात या भोंदू बाबाला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्या असून त्याचे अनेक बडे नेते, सेलिब्रिटींशी संबंध समोर आले आहेत. संजय राऊतांनी याला 'खरात फाइल्स' म्हणत मुख्यमंत्र्यांच्या कारवाईचे कौतुक केले आहे, मात्र अनेक मंत्र्यांवरही टीका केली आहे. हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे.

Sanjay Raut : कॅप्टन खरातची एपस्टिनसोबत तुलना, संजय राऊत यांचा घणाघात, म्हणाले, जगात आणि राज्यात...
संजय राऊतांची घणाघाती टीका
| Updated on: Mar 20, 2026 | 11:35 AM
Share

स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अर्थात भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण राज्यभरात गाजतं आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहे. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. अशोक खरातवर अनेक आरोप असून राज्यातील अनेक बडे नेते , राजकारणी, सेलिब्रिटीही त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्याने कोट्यवधींची मायाही जमवल्याचा आरोप आहे. याच प्रकरणावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही टीकास्त्र सोडलं आहे. जगभरात गाजणाऱ्या एपस्चटीन फाइल्सशी याची तुलना त्यांनी केली असून जगात एपस्टीन फाइल्स तर महाराष्ट्रात खरात फाइल्स गाजत आहे, असं राऊत म्हणाले.

राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

खरात प्रकरणाची पाळमुळे उखडून काढणयासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी गृहखात्याच्या माध्यमातून जी मोहिम राबवली , त्यासंदर्भातील माहिती आता समोर येत आहे. या महाराष्ट्राल कलंकित करणारी, बदनाम करणारी अशी कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा देणार पुढारी, मंत्री या सगळ्यांचं धाबं मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेलं दिसतंय. आम्ही मुख्यमंत्र्यांव नेहमी टीका करतो, कालही आम्ही याप्रकरणात त्यांच्यावर टीका केली. पण जसजशी माहिती समोर येत्ये, की गेल्या 15 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी खरात फाईल्स संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि पोलिसांची पथकं काम करत होती, ते ऑपरेशन यशस्वी झालं, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत साफसफाई सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहेत, असंही ते म्हणाले.

अशोक खरात हा फडणवीसांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे गुरूमहाराज आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्या आहेत, त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. काही लोकांना तर आयसीयूमध्ये भरती कराव लागलं आहे, अशी माहिती समोर येत आहे. या भोंदूबाबाने पोलिसांनी जी माहिती दिली आहे ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रीमंडळातले 9 मंत्री हे या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधि करत होते अशी टीका राऊतांनी केली.

चाकणकरांना तर जावच लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो समोर आले असून त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षांपुरता मर्यादित नाहीये ना. या प्रकरणात मंत्रीमंडळातले काही मंत्री आहेत, काही महत्वाचे नेते आहेत, याांचाही विचार केला पाहिजे.  महिला आगोयाच्या अध्यक्षांना तर जावचं लागेल, त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडले तर ते राज्याचं दुर्दैव ठरेल, असं राऊत म्हणाले.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग