Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर प्रकरणात अपडेट, तिघांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, पण.. चांदगुडे कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय
Kunal Chandugade Khavdya Dongar Case: खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. खवड्या डोंगरावरुन तीन लोकांचा मृत्यू झाला होता आता याच चांदगुडे कुटुंबाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Kunal Chandgude Case: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरुन पडून तीन लोकांचा मृत्यू झाला. एका झटक्यात संपूर्ण कुटुंब संपले. सुरुवातीला आयफोनचा वाद होता असं म्हटलं जात होते, पण नंतर मात्र या प्रकराणाला वेगवेगळ्या दिशा फुटलेल्या पाहायला मिळाल्या. चांदगुडे कुटुंबातील अंतर्गत वाद असल्याचे नंतर समोर आले. या कुटुंबात अंतर्गत इतका कलह होता की तो त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळीही जाणवला. पण अंत्यसंस्कार जरी वेगवेगळ्या ठिकाणी झाले असले तरीही आता मात्र या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.
कुणाल चांदगुडे, संगीता चांदगुडे आणि मुरलीधर चांदगुडे यांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले होते. मुरलीधर यांच्यावर अंत्यसंस्कार हे त्यांच्या गावी करण्यात आले होते. तर संगीता आणि कुणाल यांच्यावर त्यांच्या माहेरी संगीता यांच्या वडिलांनी अंत्यसंस्कार केले. आता त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम मात्र एकाच ठिकाणी करणार आहे. अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. आता या बाबतीत किती तथ्य आहे हे सांगता येत नाही.
या पोस्टमध्ये तिघांचा फोटो आहे, यात ठिकाण, वेळ याची माहिती दिली आहे. तिघांचा फोटो लावलेला असून तेराव्याच्या कार्यक्रमाचे ठिकाण हे जालन्यात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर हा कार्यक्रमाची तारीख ही आजचीच म्हणजे 2 सप्टेंबर 2026 ची असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आता ही पोस्ट खरी आहे की Ai ने बनवलेली याबाबतची माहिची अद्याप समोर आलेली नाही.
कुणाल चांदुगडे हा खवड्या डोंगरावरुन उडी मारायला गेला होता. यावेळी त्याची आई संगीताने खूप विनंती केली पण तो काही ऐकत नव्हता, त्याच्या वडिलाने त्याला मागे खेचण्यासाठी त्याच्या जवळ गेले. पण या झटापटीत त्यांचाच पाय घसरला आणि ते दोघे खाली पडले. डोळ्यासमोर मुलाचा आणि नवऱ्याचा मृत्यू पाहून संगीता या स्वत:ला सावरु शकल्या नाही, त्यांनी ही या डोंगरावरुन उडी मारली आणि आपले आयुष्य संपवलं. चांदगुडे कुटुंबाच्या अंतानंतर त्यांच्या घरच्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.