इंदुरीकर महाराज हे काय बोलून गेले, लेकीवरील प्रेमासाठी…म्हणाले माझं जगणं….

लेकीच्या साखरपुडा सोहळ्यामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले. आता त्यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी संताप व्यक्त करत ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलंय.

इंदुरीकर महाराज हे काय बोलून गेले, लेकीवरील प्रेमासाठी...म्हणाले माझं जगणं....
indurikar maharaj
Updated on: Nov 13, 2025 | 7:50 PM

Indurikar Maharaj : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्याच्या शाही सोहळ्याचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. काही लोकांनी त्यांना, त्यांच्या मुलीलाही ट्रोल केले. या ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराज शांत होते. परंतु आता त्यांनी या विषयावरील मौन सोडलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर तसेच त्यांच्यावर टीका करण्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराज प्रचंड संतापले असून माझं जगणं मुश्कील करून टाकलंय, अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यावर नेहमीच टीका करण्यात आली परंतु…

सध्या इंदुरीकर महाराज यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ते एका ठिकाणी कीर्तन करत असल्याचे दिसत आहे. याच कीर्तनात त्यांनी मुलीच्या साखरपुड्याचा सोहळा आणि त्यावर लोकांनी केलेली टीका यावर सविस्तर भाष्य केलंय. माझ्यावर नेहमीच टीका करण्यात आली. परंतु आता हे लोक माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं. असे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी मी कीर्तनापासून दूर जाणार असल्याचीही भावना व्यक्त केली.

त्या व्यक्तीला तेवढी तरी लाज असायला हवी

माझ्या मुलाचा तसेच माझ्या मुलीचाही यात काहीही दोष नाही. आठ दिवसात माझं जगणं मुश्कील करून टाकलं आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्या व्यक्तीने कमेंट केली तर तुम्हाला कसे वाटेल. साखरपुड्याचे कपडे नवरदेवाकडचे घेत असतात. क्लिप टाकणाऱ्याला तेवढी तरी माहिती असायला हवी होती. त्या व्यक्तीला तेवढी तरी लाज असायला हवी होती, अशी संतापजनक भावनाही इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली.

इंदुरीकर महाराज कीर्तनापासून दूर होणार?

दरम्यान, आता यापुढे मी कीर्तन सादर करायचे की नाही याबद्दलही विचार करणार आहे, असे मोठे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे इंदुरीकर महाराज कीर्तनापासून दूर होण्याचा निर्णय घेतात की काय? असा सवाल आता केला जातोय.