शिंदेगटाच्या शाखांवर बोलताना पेडणेकरांनी राणेंचा दाखला दिला आणि म्हणाल्या…

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.

शिंदेगटाच्या शाखांवर बोलताना पेडणेकरांनी राणेंचा दाखला दिला आणि म्हणाल्या...
Image Credit source: social media
| Updated on: Oct 12, 2022 | 1:26 PM

रमेश शर्मा, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केलीय. तसंच शिंदेगटाच्या नव्या शाखांवरही त्यांनी भाष्य केलंय.जेव्हा नारायण राणे गेले तेव्हा अनेक शाखा उघडल्या आता ते कुठे आहेत?, असं पेडणेकर (Kishori Pedanekar) म्हणाल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. मुंबईत आता 30 शाखा उघडण्यात आल्या आहेत. तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी हा आवडा 150 वर नेण्याचा शिंदेगटाचा मानस आहे. तर दादरमधील मध्यवर्ती कार्यालयाचं कामही अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदेगटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यावर पेडणेकरांन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून निर्माण झालेल्या वादावर पेडणेकर बोलले आहेत.ऋतुजा लटके महानगरपालिका आयुक्त सनधी अधिकारी आहेत. हे अधिकारी कायदा कानून मानून चालतात असं वाटतं होतं. इकबाल चहल यांनी कोविड काळात यांच्या बरोबर काम केलं आणि त्यांना नाव मिळालं. इतकं होऊन ते आज ट्रीगर पॉईंटवर काम करत आहेत. एका विधवा बाईने ठरवलं की आपल्या पतीच काम पुढे नेलं पाहिजे. बाळासाहेब यांच्या विचारांचा शिंदेसाहेब उल्लेख करत आहेत. मग का तिची मुस्कट दाबी करत आहेत. तिची बांधिलकी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. .

शिवसेनेला मिळालेल्या मशाल चिन्हावरून वाद सुरु आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. निवडणूक आयोगाने आम्हाला मशाल चिन्ह दिलं आहे. दिलेला निर्णय ते मागे घेऊ शकत नाहीत. आम्हाला काहीच शंका नाही, असं पेडणकर म्हणाल्या आहेत.