AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarpanch Salary: गावच्या सरपंचाला पगार किती असतो? 99 टक्के लोकांना माहिती नसेल

Sarpanch Salary: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता चर्चा सुरू आहे ती नवनिर्वाचित सरपंचांच्या अधिकारांची आणि त्यांना मिळणाऱ्या मानधनाची. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, गावाची धुरा सांभाळणाऱ्या सरपंचाला नक्की पगार किती असतो?

Sarpanch Salary: गावच्या सरपंचाला पगार किती असतो? 99 टक्के लोकांना माहिती नसेल
sarpanchImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 29, 2026 | 2:45 PM
Share

राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर वनिर्वाचित सरपंचांच्या अधिकारांची आणि त्यांना मिळणाऱ्या मानधनाची चर्चा सुरु झाली. गावची धुरा सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला किती पगार असतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया सरपंचाचा पगार आणि शासनाकडून कोणत्या सुविधा मिळतात…

सरपंचाचे मानधन आणि लोकसंख्येनुसार त्याचे निकष

ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सरकारी नोकरांप्रमाणे ठराविक पगार नसून त्यांना दरमहा मानधन दिले जाते. महाराष्ट्र शासनाने २०२४ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. हे मानधन गावाच्या लोकसंख्येवर आधारित असते. ज्या गावांची लोकसंख्या २,००० पर्यंत आहे, तिथल्या सरपंचांना आता ३,००० रुपयांऐवजी ६,००० रुपये मानधन मिळते. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २,००१ ते ८,००० दरम्यान आहे, त्यांच्या सरपंचांचे मानधन ४,००० वरून ८,००० रुपये करण्यात आले आहे. तसेच, ८,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांच्या सरपंचांना आता ५,००० ऐवजी १०,००० रुपये दरमहा मानधन दिले जाते.

उपसरपंचांचे सुधारित मानधन

सरपंचांच्या मानधनासोबतच उपसरपंचांच्या मानधनातही सरकारने वाढ केली आहे. २,००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात उपसरपंचाला २,००० रुपये, २,००१ ते ८,००० लोकसंख्या असलेल्या गावात ३,००० रुपये आणि ८,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ४,००० रुपये मानधन मिळते.

सरपंचाच्या जबाबदाऱ्या आणि मिळणाऱ्या सोयी-सुविधा

सरपंच हा गावाच्या विकासाचा मुख्य केंद्रबिंदू असतो. गावातील प्रशासकीय बैठकांचे अध्यक्षपद भूषवणे, विकासकामांची अंमलबजावणी करणे आणि सरकारी योजना थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे ही त्यांची मुख्य कामे असतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना मानधना व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या सुविधाही मिळतात. अधिकृत कामासाठी तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रवास करावा लागल्यास त्यांना प्रवास भत्ता दिला जातो. ग्रामपंचायत कार्यालयात बसण्याची व्यवस्था आणि कामासाठी आवश्यक कार्यालयीन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय, शासनाकडून वेळोवेळी नवीन योजनांची माहिती देण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही पुरवले जाते, जेणेकरून गावाचा कारभार कार्यक्षमतेने चालू शकेल.

Follow Us
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल