‘आमचं ठरलंय’ वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने

'आमचं ठरलंय' वरुन मुन्ना-बंटी मतदानादिवशीही आमने-सामने

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एकमेकांचे हाडवैरी अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची टोलेबाजी मतदाना दिवशीही सुरुच आहे. कोल्हापुरात आपलं ठरलंय याची हवा गेली असल्याचा टोला धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना लगावला. त्याला उत्तर देताना सतेज पाटील यांनी आपलं ठरलंय मधली हवा गेली म्हणणं […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:00 PM

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एकमेकांचे हाडवैरी अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची टोलेबाजी मतदाना दिवशीही सुरुच आहे. कोल्हापुरात आपलं ठरलंय याची हवा गेली असल्याचा टोला धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना लगावला. त्याला उत्तर देताना सतेज पाटील यांनी आपलं ठरलंय मधली हवा गेली म्हणणं हा जनतेचा अपमान, मतदानादिवशी असा अपमान लोक सहन करणार नाहीत, असं उत्तर दिलं.

..हवा गेली : धनंजय महाडिक

कोल्हापुरात आपलं ठरलंय याची हवा गेली असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना लगावला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन मतदान केले. महाडिक यांचे सर्व कुटुंब या महिन्यापासून प्रचारात होते. आज मतदानाला आल्यानंतर त्यांनी विजयाचा दावा केला.

हा जनतेचा अपमान – सतेज पाटील

आमचं ठरलंय म्हणत जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आहे.  आपलं ठरलंय मधली हवा गेली म्हणणं हा जनतेचा अपमान आहे. मतदानादिवशी असा अपमान लोक सहन करणार नाहीत, असं सतेज पाटील म्हणाले.

कोल्हापुरात आमचं ठरलंय

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्यांना मदत करण्यास थेट नकार दिला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात ठिकठिकाणी ‘आमचं ठरलंय’ असे बोर्ड लावले आहेत. त्याची चर्चा केवळ कोल्हापुरातच नाही तर राज्यभरात सुरु आहे. शरद पवार यांनीही या कॅम्पेनची दखल घेतली.

रद पवार यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात लावलेले ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड चांगलेच जिव्हारी लागले आहेत. सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ या जाहिराती सर्वत्र लागल्या आहेत. तुम्ही ठरवलंय तर मी सुद्धा कधी विसरणार नाही, अशी थेट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

कोल्हापूरमधील लढत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. धनंजय महाडिक हे आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशी वैर आहे. मात्र या मतदारसंघात सतेज पाटील यांची निर्णायक भूमिका राहणार आहे. कोल्हापूरमध्ये 23 एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे मतदानापर्यंत कोण कुणाची मतं फोडतं याची चर्चा कोल्हापुरात सुरु आहे.

संबंधित बातम्या 

मुन्नांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये : चंद्रकांत पाटील  

वेळ नेहमीच अनुकूल नसते, सतेज पाटलांचं ‘आमचं ठरलंय’ पवारांच्या जिव्हारी   

पवारांचं सतेज पाटलांवर कागलमध्ये भाष्य नाही, मात्र हातकणंगलेत जाऊन टीका  

मुन्ना-बंटीमध्ये समेट घडवणं शरद पवारांनाही अशक्य!  

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें