AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एका कांडाने महाराष्ट्र हादरला, सावकाराच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ, अनेक महिलांवर अत्याचार; पीडितेच्या दाव्याने मोठी खळबळ

कोल्हापुरात सावकार अमित सावंतने व्याजासाठी महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या दाव्यानुसार, सावंतने अशा अनेक असहाय्य महिलांचे लैंगिक शोषण केले असून, त्याच्या मोबाईलमध्ये २०० ते ३०० अश्लील व्हिडीओ आहेत. गांधीनगर पोलिसांनी सावंतला अटक केली असून, या प्रकरणी इतर महिलांनीही पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रकरण महाराष्ट्रात खळबळ उडवत आहे.

आणखी एका कांडाने महाराष्ट्र हादरला, सावकाराच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ, अनेक महिलांवर अत्याचार; पीडितेच्या दाव्याने मोठी खळबळ
आणखी एका कांडाने महाराष्ट्र हादरलं
| Updated on: Apr 23, 2026 | 12:59 PM
Share

नाशिकमध्ये सध्या भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य समोर आल्यानंतर अख्खं राज्य हादरलं. त्याचं हे प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एका कांडाने महाराष्ट्राला हादरा बसला आहे. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी संबंधित सावकार अमित सावंत याच्यावर कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये नको त्या गोष्टी असल्याचा दावा पीडित महिलेने केल्याने आणखीनच मोठी खळबळ माजली आहे. सावकार अमित सावंत याने फक्त या एकाच महिलेवर नव्हे तर अनेक असहाय्य महिलांवर अत्याचार केले असून, त्याचे घाणेरडे, अश्लील 200 ते 300 व्हिडिओ या सावकाराच्या मोबाईल मध्ये असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. तिच्या. दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कर्ज दिलं, पण व्याज परत केलं नाही म्हणून महिलेवर अत्याचार

पोलिसांच्या ताब्यात असलेला अमित सावंत हा पेशाने कारचालक असला तरी तो खाजगी सावकारी देखील करतो. यातूनच कोल्हापूर जवळील गडमुडशिंगी गावात राहणाऱ्या एका महिलेची त्याच्याशी ओळख झाली. संबंधित महिलेला पैशांची गरज असल्यामुळे दोन वर्षांपूर्वी तिने सावंत यांच्याकडून दहा टक्के दोन लाख रुपये व्याजाने घेतले. काही महिने व्याज सुरळीत दिल्यानंतर आर्थिक परिस्थिती मुळे संबंधित महिलेला सावंत याच्याकडे व्याज भरणं शक्य झालं नाही. मात्र याचा गैरफायदा घेत अमित सावंत हा संबंधित महिलेच्या घरी गेला आणि त्याने या महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केले. एवढंच नव्हे तर या घटनेचा त्याने व्हिडिओ देखील शूट केला. आणि त्यानतंर त्याने याच याच व्हिडिओच्या आधारे पीडित महिलेला धमकावत तिच्यावर पुन्हा अत्याचर केले असा आरोप.

मित्रांनाही दाखवले अश्लील व्हिडीओ

त्याच नराधम सावकाराचा नीचपणा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने हे अश्लील व्हिडिओ त्याने आपल्या मित्रांना देखील दाखवले. यामुळे संतप्त झालेल्या पीडित महिलेने जाबा विचारला. मात्र त्यानंतर अमित सावंत यांनी त्या महिलेसह तिच्या नातेवाईकांना जबर मारहाण केली. अखेर या पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत, अमित सावंत याच्या गैरकृत्याचा पाढा वाचला. गांधीनगर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अमित सावंत याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक देखील केली आहे.

दरम्यान पीडित महिलेने अमित सावंत सह त्याचा मित्र रोहित कदम सावंत याच्या पत्नीवर देखील गंभीर आरोप केले आहेत. आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक असहाय्य महिलांवर, सावंत याने अशाच पद्धतीने अत्याचार केले. त्याचा मोबाईलमध्ये असे 200 ते 300 व्हिडिओ आहेत, असा दावाही पीडिततेने केला आहे. सावंतन्े ज्या महिलांवर अत्याचार केला, त्यांनी हिंमत करून आता तक्रारीसाठी समोर यावं असं आवाहनदेखील पीडित महिलेने केलं असून अमित सावंत याला फाशी देण्याची मागणी या पीडितेने केली आहे. या प्रकरणात तक्रार देण्यासाठी आणखीनही महिला पुढे येण्याची शक्यता असल्याने येत्या काळात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत..

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला