AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Rain: राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत 347.40 फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून, नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.

Kolhapur Rain: राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
| Updated on: Aug 10, 2022 | 4:01 PM
Share

कोल्हापूरः गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड जोरदार पाऊस (Kolhapur Heavy Rain) सुरू आहे. कोल्हापुरसह राधानगरी धरण (Radhanagari Dam) परिसरात ही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मंगळवारी दिवसभर पाऊस थांबला होता. त्यामुळे धरणाची पाणी पातळी स्थिर होती, आज पहाटे पावसाचा जोर वाढला असून पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास धरणाचा 6 नंबरचा दरवाजा उघडण्यात आला. तर दरम्‍यान सकाळी 8.55 वाजता धरणाचा दुसरा स्वयंचलित दरवाजाही  खुला (Automatic door open). या दोन दरवाजातून 2856 क्युसेक व धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी 1600 क्यूसेक असा एकूण 4456 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे. राधानगरी धरण परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने सध्या स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत.

धरण पूर्ण क्षमतेने भरले

राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत 347.40 फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता असून, नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता प्रवीण पारकर यांनी केले आहे.

धरणातील पाण्याचा विसर्ग 1428

धरणातील पाण्याचा विसर्ग 1428 तर पॉवर हाऊसमधून 1600 क्‍यूसेक असा एकूण 3028 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गावांना सतर्कतेचा इशारा

जोरदार पावसामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज दुपारी 12 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट 04 इंच इतकी झाली होती त्यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पंचगंगेवरील 75 बंधारे पाण्याखालील गेले असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...