AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणालच्या निधनाची बातमी धडकली अन् मित्रांना जबर धक्का… जवळच्या मित्राने सांगितली कुणालची ती सवय

Kunal Chandvade : कुणालच्या मित्रांनी त्याच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. क्लासमध्ये त्याची वर्तणूक कशी असायची याबाबतही मित्रांनी भाष्य केले आहे.

कुणालच्या निधनाची बातमी धडकली अन् मित्रांना जबर धक्का... जवळच्या मित्राने सांगितली कुणालची ती सवय
Kunal Classmates StatementImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 23, 2026 | 9:20 PM
Share

ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील कुणाल चांदवडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. कुणालने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी आलेले त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशातच आता कुणालच्या मित्रांनी त्याच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. क्लासमध्ये त्याची वर्तणूक कशी असायची याबाबतही मित्रांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कुणालचे फक्त दोन मित्र होते…

खवड्या डोंगर आत्महत्या प्रकरणातील कुणालच्या कोचिंग क्लासमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणाल अभ्यासात हुशार होता, त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. NEET च्या तयारीसाठी आकाश फाउंडेशनमध्ये तो कोचिंग घेत होता. कुणाल बेंच क्रमांक तीनवर बसायचा, तसेच क्लासमध्ये कुणालचे फक्त दोन मित्र होते. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल क्लासला अधिक सुट्ट्या मारायचा त्याची ही सवय होती अशी माहितीही समोर आली आहे.

आयफोन हे मृत्यूचे कारण नव्हते…

कुणालच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. त्यांच्या मित्रांनी सांगितले की, तो असं करेल असं वाटलंच नव्हतं, कुणाल अत्यंत संस्कारी आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. कुणाल क्लासला असायचा, तसेच तो अभ्यासात हुशार आणि चांगले मार्क मिळवणारा विद्यार्थी होता. कुणालने कधीही कोणतीही अडचण किंवा तणाव मित्रांसमोर बोलून दाखवला नाही. आयफोन हे कुणालच्या मृत्यूचं कारण नव्हतं, नेमकं कारण आम्हाला माहिती नाही असं विधान त्याचा मित्र हर्षद गावंडे याने केलं आहे.

कुणालला जीव द्यायचाच नव्हता, पण…

कुणालच्या मावस काकांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालच्या आई-वडिलांमध्ये घरगुती कारणातून छोटा-मोठा वाद होत होता. आई-वडिलांनी भांडू नये, त्यांना भीती दाखवून वाद थांबवावा, या उद्देशाने कुणाल डोंगरावर गेला होता. कुणाला डोंगरावरून खाली उडी मारायचीच नव्हती असेही आता समोर आले आहे. मात्र वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी तोल गेल्याने तो आणि त्याचे वडील दोघेही डोंगरावरून खाली कोसळले आणि त्यांचा अंत झाला. त्यानंतर कुणालच्या आईनेही डोंगरावरून खाली उडी मारून जीव दिला.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!