AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kunal Kamra : कुणाल कामराचं पोलिसांना पत्र, मोठी मागणी, कोर्टातही धाव, नवीन अपडेट काय?

शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी 24 मार्च रोजी कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका शोमध्ये कुणाल कामरानमे एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गातं त्यांना 'गद्दार' म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

Kunal Kamra : कुणाल कामराचं पोलिसांना पत्र, मोठी मागणी, कोर्टातही धाव, नवीन अपडेट काय?
कुणाल कामराचं पोलिसांना पत्र, मोठी मागणीImage Credit source: social media
| Updated on: Apr 07, 2025 | 9:42 AM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यामुळे अडचणीत सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहे. ही घटना उजेडात आल्यावर, त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी अनेक समन्स बजावले होते. मात्र अद्यापही कुणाल कामरा चौकशीसाठी किंवा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये हजर झालेला नाही. उलट त्यानेच आता पोलिसांना पत्र पाठवलं एक मोठी मागणी केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी त्याने पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे. एकनाथ शिंदेवर केलेल्या विवादास्पद टिप्पणीनंतर चौकशीसाठी पोलिस स्टेशनला हजर राहून जबाब नोंदवावा असे समन्स पोलिसांनी त्याला बजावलं होतं.

मुंबई हायकोर्टातही घेतली धाव

कुणालने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना पत्र पाठवलं तर दुसरीकडे खार पोलिस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी तो मुंबई हायकोर्टातही गेला आहे. एफआयर रद्द करण्यासाठी त्याने हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. कुणाल कामराकडून शनिवारी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. एफआयआरची वैधता, अचूकता आणि योग्यतेला आव्हान देत कामराने एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या एका व्हिडिओमध्ये, त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ‘गद्दार’ म्हटले होते, त्यानंतर मुंबईतील खार पोलिस ठाण्यात कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तिसरं समन्स बजावूनही गैरहजर

कुणाल कामराला 2 एप्रिलला तिसरे समन्स बजावण्यात आले होते, ज्यामध्ये त्याला 5 एप्रिल रोजी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कुणाल कामरा या समन्सचे पालन करण्यात अयशस्वी ठरला, त्यामुळे त्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऑप्शनची विनंती केली. खार पोलिसांनी अद्याप कुणाल कामराच्या नव्या अपीलवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

4 एप्रिल रोजी खार पोलिसांचे एक पथक कुणाल कामराविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरच्या तपासासाठी पाँडेचेरीला पोहोचले. कुणाल कामरा हा तामिळनाडूचा स्थानिक रहिवासी आहे. दरम्यान, कामरा याला मद्रास उच्च न्यायालयातून 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे. अटकेपासून तात्पुरते संरक्षण देणाऱ्या एफआयआरची नोंद न झालेल्या राज्यात त्याला हा जामीन देण्यात आला आहे.

काय आहेत आरोप ?

शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी 24 मार्च रोजी कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका शोमध्ये कुणाल कामरानमे एका गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गातं त्यांना ‘गद्दार’ म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल कामरा याने पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले, मात्र सध्या तो मुंबईत नाही. आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही, या भूमिकेवरही तो ठाम आहे.

राजकारण्यांची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही, असे कुणाल कामराने या संपूर्ण वादानंतर आवर्जून सांगितले. प्रभावशाली नेत्याची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही, असे त्यान म्हटले होते. जर एखाद्या विनोदाने कोणाच्या भावना दुखावल्या तर त्याचा अर्थ माझा व्यक्त होण्याचा अधिकार संपला असे नाही, असेही त्याने नमूद केलं होतं.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.