AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींना दणका! राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 33 हजार लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र, लवकरच वसुली

राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दणका मिळाला आहे. या जिल्ह्यातील तब्बल 33 हजार लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. इतकं नव्हे तर नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांकडून लवकरच वसुली होणार आहे.

लाडक्या बहिणींना दणका! राज्यातील 'या' जिल्ह्यातील 33 हजार लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र, लवकरच वसुली
लाडकी बहीण योजनाImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 14, 2026 | 10:10 AM
Share

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. या जिल्ह्यातील तब्बल 33 हजार 304 महिला लाभार्थी या योजनेसाठी कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. प्रशासनाने तब्बल 8 ते 10 महिने राबवलेल्या ई-केवायसी मोहिमेनंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामध्ये अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले असून, चक्क काही पुरुषांनीही महिलांचं नाव दाखवून या योजनेचा नियमबाह्य लाभ घेतला आहे. याशिवाय चुकीची ई-केवायसी, उत्पन्नाचे खोटे दाखले, आयकर भरणं आणि चारचाकी वाहन असणं अशा विविध कारणांमुळे या महिला अपात्र ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, या अपात्र लाभार्थ्यांनी तब्बल 15 ते 20 महिने शासनाची दिशाभूल करून पैसे लाटले आहेत. आता अशा सर्व बोगस आणि नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांकडून शासन पूर्ण रक्कम वसूल करणार आहे, त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अनेकांकडून योजनेचा गैरफायदा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती. तेव्हा या योजनेअंतर्गत सरसकट महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर लगेचच अर्ज मंजूर करून दर महिना 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत होते. मात्र या योजनेचा गैरफायदा असंख्य महिलांकडून होत असल्याचं निदर्शनास येताच सरकारने ई-केवायसी आणि अर्जांची पडताळणी सुरू केली. आतापर्यंत या योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना अपात्र म्हणून वगळण्यात आलं आहे. त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील 33 हजार महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत.

योजनेतून 80 लाख अपात्र लाभार्थी वगळले

बँक खातं असलेल्या प्रत्येक ग्राहकाला दरवर्षी ‘केवायसी’ करावं लागतं. निकषात न बसणाऱ्या काही महिलांनी घाबरूनच ई-केवायसी केलं नाही. सरकारने प्राप्तिकर भरणाऱ्या, वयाचं, उत्पन्नाचं निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींना या योजनेतून टप्प्याटप्प्याने वगळलं. राज्यात या योजनेतून तब्बल 80 लाख अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आलं आहे. नावावर वाहन असलेल्या महिलांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मागविण्यात आली. तसंच अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणींना या योजनेतून बाद करण्यात आलं. धक्कादायक म्हणजे महिलांसाठीच्या या योजनेचा लाभ असंख्य पुरुषांनी घेतला. महिलांच्या खोट्या नावाने पुरुषांनी सादर केलेल अर्ज मंजूर कसे झाले, असाही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.

Follow Us
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा