AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 3000 हजार रुपये मिळणार?

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 3000 हजार रुपये मिळणार?
Follow us
| Updated on: Mar 23, 2025 | 3:54 PM

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.  आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकूण 9 हाफ्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती.

दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आली. मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही दीड हजार रुपयेच देण्यात येत आहेत. 2100 रुपये कधीपासून मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र तुर्तास तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.  राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले फुके? 

लाडकी बहीण योजना सुरुच राहाणार आहे,  या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. 2100 काय तीन हजार रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागेल.  मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, 2100 नाही तर तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबावं लागणार आहे.  आमच्या लाडक्या बहि‍णींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत, 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत, आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतशे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3000 हजार रुपये देऊ, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.