AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : तर दर महिन्याचे 1500 रुपये बंद होणार, लाडक्या बहिणींची धावपळ, डेडलाईन जवळ, फक्त…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत, अंतिम मुदत 30 एप्रिल 2026. सुमारे 26 लाख महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना दरमहा मिळणारे ₹1500 बंद होऊ शकतात. महिला व बाल विकास विभागाने अनेकदा मुदतवाढ देऊनही ही संख्या मोठी आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana : तर दर महिन्याचे 1500 रुपये बंद होणार, लाडक्या बहिणींची धावपळ, डेडलाईन जवळ, फक्त…
लाडक्या बहिणींची धावपळ सुरूूImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 28, 2026 | 8:56 AM
Share

महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ सर्वत्र बोलबाला आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेअंत्रगत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या महिलांना सशक्त करण्यासाठी सरकारने ही योजना जाहीर केली, ज्याचा 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेचा सरकारलही मोठा फयाद झाला कारण विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं आणि ते पुन्हा सत्तेवर आले. मात्र या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे उघडकीस आल्यावर पडताळणी करण्यााचा निर्णय घेण्यात आला. तसेच ई-केवायसी देखील अनिवार्य करण्यात आली.

याच ई-केवायसीबाबाबत महत्वाची अपेडट आता समोर आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी करण्यासाठी आता अवघ्या 3 दिवसांची मुदत उरली असून गुरूवार, 30 एप्रिल 2026 ही याची शेवटची तारीख आहे. मात्र अजूनही 26 लाख महिलांची ई-केवायसी बाकी असून ती प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना योनजेचा लाभ आणि पर्यायाने मिळणारे पैसे बंद होतील. त्यामुळेच राज्यातील 26 लाख महिलांची धावपळ सुरू आहे.

दीड हजारांसाठी 26 लाख लाडक्या बहिणींची धावपळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत ही शेवटची तारीख आहे. ही मुदत संपायला अवघे तीनच दिवस उरले असताना अजूनही सुमारे 26 लाख लाडक्या बहिणींची केवायसी बाकी आहे. ऑनलाइन ग्राहक ओळख अर्थात ई-केवायसी केली नाही तर महिलांना मिळणारा योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसी करण्यासाठी आत्तापर्यंत 3 वेळा मुदतवाढ दिली. मात्र त्यानंतरही काही ना काही कारणास्तव सुमारे 26 लाख 34 हजार महिलांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आता 30 एप्रिल ही शेवटची तारीख असून तोपर्यंत ई-केवायसी प्रक्रिय झाली नाही तर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते. या उर्वरित महिलांनी 30 तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर इतक्या मोठ्या प्रमाणत महिला, लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरू शकतात. त्यामुळे त्यांना दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांना मुकावे लागू शकते. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी लवकरता लवकर प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्याेना योजनेचा लाभ आणि मिळणारे पैसे यांच्यापासून वंचित रहावे लागू शकते.

कशी कराल ई-केवायसी ?

– e-KYC साठी सर्वात प्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

– त्यानंतर मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

– या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

– यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.

– जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

– जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

– जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

– यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

– त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

– शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच