लाडक्या बहिणींसाठी पुन्हा ई-केवायसी सुरू? अखेर एकनाथ शिंदेंनी भर सभेत सांगून टाकलं; टेन्शन मिटलं!
लाडकी बहीण योजनेबात मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीबाबत मोठे विधान केले आहे. या विधानामुळे आता लाडक्या बहिणींचे टेन्शन मिटले, असे म्हटले जात आहे.

Ladki Bahin e-KYC : लाडकी बाहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3000 रुपये मिळाले आहेत. काही लाडक्या बहिणींना मात्र हे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. ई-केवायसी तसेच इतर तांत्रिक कारणामुळे अनेक लाडक्या बहिणी लाभापासू वंचित राहिल्या आहेत. त्यामुळेच आम्हाला आमचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न या लाभार्थी महिला विचारत आहेत. तसेच ई-केवायसी रखडल्यामुळे किंवा काही त्रुटी राहिल्यामुळे जर आम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणारा 1500 रुपयांचा लाभ मिळणार नसेल तर पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी दिली जाणार का? असेही लाडक्या बहिणींकडून विचारले जात आहे. असे असतानाच ई-केवायसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
ई-केवायसीची मुदत वाढवण्याची मागणी
यावेळी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट मार्च आणि एप्रलि महिन्याचे एकूण 3000 रुपये पाठवण्यात आलेले असले तरी दुसरीकडे मात्र एकूण 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे किंवा त्यांच्या अर्जात त्रुटी आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच या महिलांना यावेळी लाभ मिळालेला नाही. याच कारणामुळे आता ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही, त्या महिलांना ती पूर्ण करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा आधार घेत लवकरच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी पुन्हा दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ई-केवायी आणि लाडकी बहीण या योजनेविषयी भाष्य केलं. लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभामध्ये बाधा आणणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम केले जात आहे. तसेच प्रत्येक पात्र महिलेपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच ई-केवायसीची प्रक्रिया सतत चालूच राहील, असेही शिंदे म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानामुळे आता भविष्यात पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.