AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : धक्कादायक, वॉचमनकडून शाळेतील विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण

Nagpur Crime : शिपाई राजेश मूलचंद मालापुरे याच्याविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खडबड उडाली असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Nagpur Crime : धक्कादायक, वॉचमनकडून शाळेतील विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण
Crime
| Updated on: Aug 19, 2026 | 8:03 AM
Share

गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रम शाळेतील तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. असं असतानाच विदर्भातूनच आश्रम शाळेतील अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंडाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रम शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोपावरून आश्रम शाळेच्या नाईट वॉचमनला कोंढाली पोलिसांनी अटक केली आहे. शिपाई राजेश मूलचंद मालापुरे याच्याविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खडबड उडाली असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुसागोंदी येथील आश्रम शाळेत एका विद्यार्थ्यावर 17 ऑगस्टच्या रात्री लैंगिक शोषण करण्यात आले, तर दुसऱ्या एका विद्यार्थ्या सोबत गैर कृत्य करण्याचा प्रकार झाला असल्याची माहिती पुढे येत आहे. पीडित विद्यार्थ्यांनी याप्रकरणी आश्रम शाळेच्या अधीक्षकाकडे तक्रार केली आहे. अधीक्षकांनी तातडीने कोंढाळी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस

नागपूरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा सातव दिवस आहे. 13 ॲागस्टपासून नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या विभागीय कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. आदिवासी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी 26 वर्षे वयाची मर्यादा हटवावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ काल संध्याकाळी मुंबईला रवाना झाले. आदिवासी विभागाचे मंत्री, आदिवासी विभागाचे सचिव यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे.

बैठकीत आंदोलनावर तोडगा निघतो का याकडे लक्ष. गुरुवारी दुपारी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु झालं. आज सहाव्या दिवशीही विद्यार्थी आदिवासी विकास कार्यालयात बसून आहेत. वयाची अट लावणारा 5 ॲागस्ट 2026 शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. नागपूर शहरातील आदिवासी वसतीगृहात राहणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात